घरदेश-विदेशपुलवामामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

पुलवामामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

Subscribe

श्रीनगर येथे जवानांनी मोठी कारवाई केली. दहशतवादी हल्ला करण्याचा कटाला जवानांनी उधळून लावले. जवळपास २० किलोग्राम आयईडी जप्त केले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. दरम्यान दोन दहशतवादी परिसरामध्ये लपून बसले असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.


हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना कंठस्थान

- Advertisement -

चकमक अद्याप सुरुच

दक्षीण काश्मिरच्या पुलवामातील अवंतीपुरा परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान त्याठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान चकमक सुरु असून दोन दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

२० किलोग्राम आयईडी जप्त

याआधी श्रीनगर येथे जवानांनी मोठी कारवाई केली. दहशतवादी हल्ला करण्याचा कटाला जवानांनी उधळून लावले. जवळपास २० किलोग्राम आयईडी जप्त केले आहे. वुलर झीलकडे जाणाऱ्या आरागाम रस्त्यावरुन जवानांनी आयईडी जप्त केली आहे. त्यानंतर या आयईडीला निष्क्रिय करण्यात आले. आरागाम रस्त्यावरुन जाताना जवानांनी काही संदिग्ध गोष्ट आढळून आली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळावर डाग स्क्वायड आणि फोरेंसिक टीमला बोलावून घेतले. तपास केल्यानंतर २० किलो आयईडी जप्त करण्यात आले. लोखंडाच्या एका बॉक्समध्ये डेटोनेटर आणि फ्यूजला ते जोडले होते. त्याला निष्क्रिय करण्यात आले. याचा स्फोट झाला असता तर जवळपास एक किलोमीटरपर्यंतचा परिसर प्रभावित झाला असता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -