घरदेश-विदेशदिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी मोदी विरोधकांची खलबतं

दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी मोदी विरोधकांची खलबतं

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला असे प्रमुख विरोधक यांच्यात बैठक झाली. “भाजपने घटनात्मक संस्थावर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात एकत्रित लढणे”, या मुद्द्यावर आमचे एकमत झाले असल्याचे, राहुल गांधी यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

- Advertisement -

दिल्ली येथे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात आज मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत विरोधी नेते सहभागी झाले होते. त्यांनंतर काही प्रमुख नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटले. या रॅलीत केजरीवाल यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी हे संविधान आणि लोकशाहीला उध्वस्त करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -