घरदेश-विदेशसोमालियाची राजधानी मोगादिशू भीषण बॉम्बस्फोटाने हादरली: 100 ठार, 300 जखमी

सोमालियाची राजधानी मोगादिशू भीषण बॉम्बस्फोटाने हादरली: 100 ठार, 300 जखमी

Subscribe

सोमालियाची राजधानी मोगादिशू (Mogadishu) पुन्हा दोन भीषण बॉम्बस्फोटाने हादरली आहे. (Somalia Bomb Blast) या स्फोटात 100 जणांचा मृत्यू झाला असून 300 लोख जखमी झाले आहेत. सोमालियाचे राष्ट्रपती हसन शेख मोहम्मदी यांनी रविवारी सकाळी या घटनेबाबत एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. शिक्षण मंत्रालयासह अनेक सरकारी कार्यालये असलेल्या परिसरात हा भीषण स्फोट झाला आहे. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी झालेल्या या स्फोटात लहान मुलांसह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. मोगादिशूमध्ये हा हल्ला अशा दिवशी घडला, जेव्हा राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ अधिकारी हिंसक अतिरेक्यांना विरोध करण्यासाठी बैठक घेत होते. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारलेली नाही.

- Advertisement -

राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांनी या हल्ल्याला क्रूर आणि भ्याड असल्याचे म्हणत दहशतवादी संघटना अल-शबाबला जबाबदार धरले आहे. सोमालियातील वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सोमालियाची राजधानी मोगादिशू दोन कारमध्ये बॉम्बस्फोट झाले. असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांना घटनास्थळावरून अनेक मृतदेह सापडले. ज्यात महिलांची संख्या जास्त होती. आता हा आकडा 100 वर पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 वर्षांपूर्वी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.


टाटा एअरबस प्रकल्पावरून महाराष्ट्रात राजकीय खडाजंगी; गुजरातमध्ये मात्र भूमिपूजनाचा आनंद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -