घरदेश-विदेशकाश्मिरी तरुणांचा आवाज; आम्हालाही वर्थमान अभिनंदन व्हायचंय

काश्मिरी तरुणांचा आवाज; आम्हालाही वर्थमान अभिनंदन व्हायचंय

Subscribe

काश्मिरी तरुणांनाही विंग कमांडर वर्थमान अभिनंदन यांच्यासारखा पराक्रम करायचा आहे. त्यांनी स्वत: तसं सांगितलं आहे. त्यामुळेच दोन हजार पेक्षा जास्त काश्मिरी तरुण आज जम्मूतील डोडा स्टेडियममध्ये सैन्य भरतीसाठी पोहोचले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात देशाचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यासाठी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानी तरुणाचा वापर केला होता. त्यामुळे काही लोकांचा काश्मीरी तरुणांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. यातूनच देशातील विविध भागांमध्ये काश्मिरी तरुणांवर हल्ला झाला. परंतु, एखादा विशिष्ट वर्ग सोडला तर काश्मीरी तरुणांचे भारतावर तितकेच प्रेम आहे. हे दिसून देखील येत आहे. काश्मीरी तरुणांनाही देशाची सेवा करायची आहे. त्यांनाही हवाई दलाचे विंग कमांडकर वर्थमान अभिनंदन यांच्यासारखा पराक्रम करायचा आहे. यासाठीच दोन हजार पेक्षा जास्त काश्मिरी तरुण आज जम्मूतील डोडा स्टेडियममध्ये सैन्य भरतीसाठी पोहोचले आहेत.

विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दल आदराची भावना

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय हवाई दलाने त्यांना पळवून लावले. परंतु, या घडामोडींमध्ये भारताचे विंग कमांडर वर्थमान अभिनंदन पाकिस्तानाच्या ताब्यात घेतले. पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागूनही त्यांनी खाली मान झुकवली नाही. मोठ्या संघर्षानंतर अभिनंदन भारतात आले. त्यांच्या याच पराक्रमाबद्दल काश्मिरी तरुणांच्या मनातही आदर असल्याचे काश्मिरी तरुणांनी सांगितले. त्यांनाही विंग कमांडर वर्थमान अभिनंदन सारखा पराक्रम गाजवायचा आहे. तसे मत त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -