घरदेश-विदेशआर्मी कॅप घातल्याबद्दल भारतीय संघावर कारवाई करा; पाकिस्तानने केली मागणी

आर्मी कॅप घातल्याबद्दल भारतीय संघावर कारवाई करा; पाकिस्तानने केली मागणी

Subscribe

पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय क्रिकेट संघाने सामन्यादरम्यान भारतीय लष्कराची कॅप घातली. शहिदांना मानवंदना देण्यासाठी संघाने कॅप घातल्या होत्या. क्रिकेट सामन्याचे राजाकारण करण्यात आले असल्यामुळे आयसीसीने भारतावर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात शहिदांना मानवंदना दिल्या जात होती. भारतीय क्रिकेट संघाने शहिदांना मानवंदना दिली. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने सैन्याची कॅप घालून शहिदांना मानवंदना दिली होती. या मानवंदनेचा पाकिस्तानकडून विरोध केला जात आहे. भारताने खेळामध्ये राजकारण आणू नये असे वक्तव्य करत भारतावर कारवाईची मागणी पाकिस्तानकडून केली जात आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आयसीसी) कडे ही मागणी केली आहे. शहिदांना मानवंदना देण्यासाठी कॅप घालण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहे.

“क्रिकेट हा मान्यवर (जंटलमन) लोकांचा खेळ आहे त्यामध्ये राजकारण करण्याचे काम भारताने केले आहे. पाकिस्तानवर भारताने हल्ला केला होता. मात्र पाकिस्तानी संघाने काळी फीत लावून क्रिकेट सामना खेळला नाही.” असे ट्विट पाकिस्तानी मंत्र्यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -