घरCORONA UPDATEधक्कादायक: हैदराबादमध्ये होम क्वारंटाईन केलेले २ हजार रुग्ण संपर्काबाहेर

धक्कादायक: हैदराबादमध्ये होम क्वारंटाईन केलेले २ हजार रुग्ण संपर्काबाहेर

Subscribe

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असताना हैदराबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे २ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते, मात्र आता हे रुग्ण संपर्क कक्षेच्या बाहेर आहेत. काही रुग्णांनी आपला संपर्क क्रमांक चुकीचा दिला होता. तर काहींनी चुकीचा पत्ता दिला होता. हैदराबाद महानगरपालिकेने होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना घरीच उपचारासाठी साहित्या (Self care Kits) वाटण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ही गोष्ट समोर आली. पालिकेच्या आकडेवारीनुसार जवळपास १० हजार रुग्ण घरी राहूनच उपचार घेत आहेत.

हैदराबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे आयुक्त बी. संतोष यांनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, आमचे आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या घरी किट देण्यासाठी गेल्यावर रोजच डझनभर रुग्णांचा थांगपत्ताच लागत नाहीये. या सर्व रुग्णांची शासकीय यंत्रणेमधून कोविड चाचणी घेण्यात आलेली आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्यांच्यात लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना घरीच उपचार घेण्यास सांगितले होते.

- Advertisement -

कोरोनाचा विषाणू हा संसर्गातून पसरतो. त्यामुळे शारिरीक अंतर राखणे हाच त्यावरचा एकमेव मार्ग आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात गेल्यानंतर संसर्ग वाढण्याच धोका असतो. आता संपर्कात नसलेल्या रुग्णांना शोधणे आणि त्यांच्या संपर्कात कोण कोण आले हे देखील शोधणे, अशी दुतर्फा लढाई पालिकेच्या आरोग्य विभागाला करावी लागणार आहे.

हैदराबाद मनपाचे आयुक्त लोकेश कुमार यांनी सांगितले की, “पॉझिटिव्ह असलेल्या कोरोना रुग्णांनी इतर लोकांच्या संपर्कात येणे किंवा बिनधास्त फिरणे योग्य नाही. ते नकळतपणे हा आजार आणखी पसरवत आहेत. लोकांनी जबाबदाररित्या वागले पाहीजे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -