घरदेश-विदेशपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ७ वर्षांचा तुरुंगवास

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ७ वर्षांचा तुरुंगवास

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अल - अजीजिया घोटाळाप्रकरणी कोर्टानं सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असून त्यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. अल – अजीजिया घोटाळ्याप्रकरणी त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर फ्लॅगशिप इनव्हस्टमेंट प्रकरणात पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना २.५ मिलियन डॉलरच्या दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.

सात वर्षांचा तुरुंगवास

भ्रष्टाचाराविरोधी न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहम्मद अरशद मलिक यांनी फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल – अजीजिया प्रकरणी निकाल दिला आहे. अल – अजीजिया घोटाळाप्रकरणी कोर्टानं त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तर फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर शरीफ यांना कोर्टातच अटक करण्यात आली आहे. खटल्याचा निकाल सुनावण्याआधीच कोर्टाबाहेर मोठा गदारोळ झाला होता. कोर्टाबाहेर पोलीस आणि शरीफ समर्थक जमले होते. समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या आहेत.

- Advertisement -


वाचा – आज नवाझ, उद्या पाक गुडघे टेकणार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -