घरदेश-विदेशहा नवा पाकिस्तान आहे; अर्थव्यस्थेसाठी पाकिस्तानचा बेली डान्स

हा नवा पाकिस्तान आहे; अर्थव्यस्थेसाठी पाकिस्तानचा बेली डान्स

Subscribe

अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी पाकिस्तानात बेली डान्सचे आयोजन करण्यात आले.

भारताने सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केल्यानंतर मोदी सरकारच्या नेत्यांकडून ‘हा नवा भारत आहे’, असे उद्गार काढले जात होते. भारतीय नेत्यांच्या या उद्गाराप्रमाणेच आता पाकिस्तानच्या माध्यमांनी देखील तिथे सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर ‘हा नवा पाकिस्तान आहे’, असे विशेषण दिले आहे. विशेष म्हणजे या नव्या पाकिस्तानात अर्थव्यस्था सुधारावी म्हणून सरकारकडून बेली डान्सचे आयोजन करण्यात येत आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानमध्ये बेली डान्सच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सरहद चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे ४ ते ८ सप्टेंबर बेली डान्सच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानच्या नागरिकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे.


हेही वाचा – ठरलं! भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवबंधन बांधणार

- Advertisement -

पाकिस्तानवर आर्थिक संकट

पाकिस्तानमध्ये संपन्न झालेल्या बेली डान्सच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारचे बेली डान्स सादर करण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठे आर्थिक संकट आले आहे. तिथे जीवनाश्मक वस्तूंकाची किंमतही गगणाला भिडली आहे. त्यामुळे या आर्थिक संकटपासून सरकारने वाचवावी, अशी आशा नागरिकांची आहे. अर्थात सरकारच्या ते प्रथम कर्तव्य आहे. सध्या जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे यावर आताच उपाय नाही शोधला तर पाकिस्तानला प्रचंड महागात पडणार आहे. मात्र, पाकिस्तानला या गोष्टीचे गांभीर्य राहिलेले नाही, अशी टीका पाकिस्तानी नागरिकांकडून सरकारवर होत आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -