घरमुंबईपुलकोंडीतून मार्ग काढत करा गणपती विसर्जन!

पुलकोंडीतून मार्ग काढत करा गणपती विसर्जन!

Subscribe

पश्चिम आणि रेल्वे मार्गावरील १६ पूल धोकादायक झाल्याने त्यावर अती भार पेलला जाणार नाही. या पुलांवर केवळ १६ टना पेक्षा अधिक भार पेलला जाणे शक्य नसल्याने पूल बंद करण्याचा निर्णय महापालिका व रेल्वेने घेतला होता.

मागील काही दिवसांपासून भक्तांचा पाहुणचार घेणाऱ्या गणरायाला आता निरोप द्यायची वेळ आली आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशीला विराजमान झालेल्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने केले जाणार आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत बापाच्या मिरवणुका निघणार आहे. मात्र या मिरवणुकांना पुलकोंडीचा त्रास होणार आहे. विसर्जन मार्गातील रेल्वेवरील १६ पूल ही धोकादायक असून या पुलांवरून विसर्जन मिरवणुकातील लोकांना गटागटाने पुलावरून पाठवून पुलाच्या खाली उतरल्यावरच मिरवणुकीचा आनंद लुटता येणार आहे.

Dont dance on weak bridges during ganpati mumbai bmc
गणपती मिरवणूक

पश्चिम आणि रेल्वे मार्गावरील १६ पूल धोकादायक झाल्याने त्यावर अती भार पेलला जाणार नाही. या पुलांवर केवळ १६ टना पेक्षा अधिक भार पेलला जाणे शक्य नसल्याने पूल बंद करण्याचा निर्णय महापालिका व रेल्वेने घेतला होता. परंतु गणेश मंडळांची विनंती लक्षात घेता ही पूल गणेश मिरवणुकीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुलावरुन विसर्जनासाठी जाताना गटागटाने जावे, जेणेकरून पुलावर एकचवेळी १६ टना पेक्षा अधिक वजन होणार नाही, असे आवाहन महापलिका व रेल्वे प्रशासनाने केले आले.पुलावर ध्वनिक्षेपक लावून नाच गाणी करू नये, पुलावरून खाली उतरल्यावर आनंद घ्यावा तसेच पुलावर जास्त वेळ थांबू नये,असेही आवाहन त्यांनी केले आहे

- Advertisement -

धोकादायक पुलांची नावे

घाटकोपर रेल्वे पूल, करी रोड रेल्वे पूल, चिंचपोकळी रेल्वे पूल,  भायखळा रेल्वे पूल, मरीन लाइन्स रेल्वे, पूल
ग्रँट रोड – फेरर रेल्वे पूल, संधास्तारर्ड रेल्वे पूल( ग्रँट रोड ते चर्नि रोड मधील) फ्रेंच रेल्वे पूल ( ग्रँट रोड ते चर्नि रोडमधील) केनेडी रेल्वे पूल ( ग्रँट रोड ते चर्नि रोडमधील) फोकलांड रेल्वे पूल ( ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रलमधील)
बेलासिस रेलवे पूल, मुंबई सेंट्रल स्टेशनजवळ, महालक्ष्मी स्टील रेल्वे पूल, प्रभादेवी,-कॅरोल रेल्वे पूल, दादर टिळक रेल्वे पूल, वीर सावरकर रेल्वे पूल (गोरेगाव व मालाड मधील) सुधीर फडके रेल्वे पूल बोरिवली, दहिसर रेल्वे पूल, मिलन रेल्वे पूल, सांताक्रूझ विलेपार्ले रेल्वे पूल, अंधेरी गोखले रेल्वे पूल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -