घरमुंबईठरलं! भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवबंधन बांधणार

ठरलं! भास्कर जाधव १३ सप्टेंबरला शिवबंधन बांधणार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. जाधव १३ सप्टेंबरला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेनेच्या वाटेवर होते. काही दिवसांपूर्वी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत त्यांची एक तास चर्चा झाली होती. त्यामुळे भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, त्यांचे अधिकृतपणे पक्षांतर झाले नव्हते. आता अखेर १३ सप्टेंबरला पक्षांतर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.


हेही वाचा – मी भाजपमध्ये जाणार नाही – भास्कर जाधव

- Advertisement -

कोण आहेत भास्कर जाधव?

भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना भास्कर जाधव मंत्री देखील होऊन गेले आहेत. याशिवाय त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदही भूषवले आहे. त्यामुळे भास्कर जाधव पक्षाला सोडून गेले तर राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होईल. भास्कर जाधव २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्याअगोदर ते शिवसेनेत होते. मात्र, शिवसेनेकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेने संदर्भातील सर्व मतभेद दूर झाल्याचे जाधव यांनी सांगितले होते. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सेना प्रवेशाचे आमंत्रण दिल्याचेही त्यांनी सांगितले. याच संदर्भात भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बैठक घेतली. या बैठकीनंतर भास्कर जाधव आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असवल्याचे निश्चित झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -