घरदेश-विदेशपाकिस्तानने 'समझोता एक्सप्रेस' केली बंद

पाकिस्तानने ‘समझोता एक्सप्रेस’ केली बंद

Subscribe

भारत सरकारने सोमवारी घेतलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारा ३७० कलम हद्दपार केल्याचा निर्णय हा पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागला आहे. काल भारताबरोबर व्यापरी संबंध तोडल्यानंतर आता भारताच्या विरोधात पाकिस्ताने देखील भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध ही अस्थरी होणार आहे. पाकिस्ताने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांनी पाकिस्तान सोडून जाण्यास सांगितले आहे. तसेच भारतात ही पाकिस्तानचे उच्चायुक्तही रुजब होणार नाहीत.

समझोता एक्सप्रेसचा इतिहास

भारत-पाकिस्तानला जोडणारे एकमेव कनेक्शन म्हणजे समझोता एक्सप्रेस होती. थार एक्सप्रेस सुरु होण्याआधी समझोत एक्सप्रेस होती. ४० पेक्षा जास्त वर्ष समझोता एक्सप्रेसला झाली आहे. ही एक्सप्रेस २२ जुलै १९७६ रोजी सुरू झाली होती. जेव्हा ही एक्सप्रेस सुरू झाली त्यावेळी ती अमृतसर ते लाहोर या मार्गावरू न धावत होती. दिल्ली, अटारी आणि लाहोर मार्गावर धावणारी ही साप्ताहिक ट्रेन आहे. भारतीय रेल्वेने ८० च्या दशकात समझोता एक्सप्रेस ही अटारीमधून बंद केली.

- Advertisement -

अनेकदा समझोता एक्सप्रेस ही बंद मागणी करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये १९ फेब्रुवारी २००७ रोजी पानिपतमधील दिवाना स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या जास्त होती. असा समझोता एक्सप्रेस प्रवास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -