घरदेश-विदेशहिंसाचारप्रकरणी हार्दिक पटेलला दोन वर्षांची शिक्षा

हिंसाचारप्रकरणी हार्दिक पटेलला दोन वर्षांची शिक्षा

Subscribe

२०१५ च्या मेहसाणा हिंसाचार प्रकरणी हार्दिक पटेलला कोर्टाने दोषी ठरवत दोन वर्षीची शिक्षा सुनावली आहे. विषनगर कोर्टाने याप्रकरणी हार्दिक पटेल याच्यासह तीन जणांना दोषी ठरवले आहे.

पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मेहसाणा येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी हार्दीक पटेल याच्यासह दोन जणांना कोर्टाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. आंदोलनावेळी त्यांनी भाजप आमदाराच्या ऑफिसची तोडफोड केली होती.

हार्दिक पटेलसह ३ जण दोषी

२०१५ मध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी हार्दिक पटेल यांच्यासह आंदोलकांनी भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या ऑफिसची तोडफोड केली होती. २३ जुलै २०१५ ला ही घटना घडली होती. या हिंसाचार प्रकरणावर आज विषनगर कोर्टामध्ये सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने हार्दिक पटेल याच्यासह ३ जणांना दोषी ठरवत शिक्षा दिली आहे.

- Advertisement -

हार्दिक पटेलच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु

विषनगर हिंसाचार प्रकरणामध्ये एकूण १७ आरोपी होते. त्यापैकी ३ जणांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. हार्दिक पटेल यांच्यासह तीन आरोपींना कोर्टाने २ वर्षाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. हार्दिक पटेल यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र जर त्यांचा जामीन मंजूर झाला नाही तर हार्दिक पटेलला जेलमध्ये जावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -