घरCORONA UPDATELockDown: पटनामध्ये मधुबनी आणि मंजुषा कलाकृती मास्कवर

LockDown: पटनामध्ये मधुबनी आणि मंजुषा कलाकृती मास्कवर

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवसाय, उद्योग, मनोरंजनपर कार्यक्रम बंद असताना पटनातील चित्रकाराने लॉकडाऊनमध्ये घरामध्ये वापरता येणारे फेस मास्क बनवले आहे. विशेष म्हणजे या मास्कवर त्यांनी मधुबनी आणि मंजुषा चित्राचे प्रकार काढून हे मास्क आकर्षक आणि सुंदर बनवले आहेत. स्मिता पराशर असे या चित्रकाराचे नाव असून त्यांनी सांगितले की, या माध्यमातून आपल्यातील कलेला प्रसिद्धी मिळावी या हेतूने मास्कवर चित्र काढले. हे मास्क बाजारात विकले जातील तेव्हा ही कलादेखील लोकांपर्यंत पोहोचेल. हे मास्क बनवण्यासाठी आम्ही कॉटन कपड्याचा वापर केला असून याची किंमत ८० ते १०० रुपये इतकी ठेवली आहे.

हेही वाचा – परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता गरजेची – शरद पवार

- Advertisement -

मधुबनी आणि मंजुषा कलेत पारंगत 

गेली २५ वर्ष मधुबनी तर सहा वर्ष मंजुषा ही पारंपारिक कला बिहारमध्ये त्या जोपासत आहेत. सरकारने आपल्यातील कलागुणांना वाव देण्याचे आवाहन लोकांना केले असताना आम्हीदेखील आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. आता मास्क बनवणे आणि त्यावर चित्रकाम करणे हा आमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मास्कवर विविध प्रकारचे चित्र काढण्याचा आमचा प्रयत्न असतो, असेही त्या म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -