घरदेश-विदेशpaytm कर्मचाऱ्यांनीच मागितली मालकाकडे खंडणी

paytm कर्मचाऱ्यांनीच मागितली मालकाकडे खंडणी

Subscribe

पेटीएम कंपनीचे एमडी विजय शेखर शर्मा यांना २० कोटींची खंडणी मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महिलेचाही समावेश आहे.

खंडणी मागण्याच्या अनेक घटना आपण रोज ऐकतो. कधी बिल्डरला गुंडांकडून खंडणीचे फोन येतात तर कधी कोणाचे अपहरण करुन खंडणी वसूल केली जाते. मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मालकाकडे खंडणी मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही कंपनी देशातील सर्वात मोठी ई वॉलेट कंपनी म्हणून ओळखली जाते. पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांना कर्मचाऱ्यांनीच २० कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार नोएडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. कंपनीच्या ग्राहकांचा डेटा लीक करण्याची धमकी देऊन २० कोटींची खंडणी मागितली होती. तक्रार दाखल केल्यानंतर नोएडा पोलिसांनी कर्मचाऱ्यांना अटक केली असून काही कर्मचारी अजूनही पसार आहे.

काय आहे प्रकरण

कंपनीचे एमडी विजय शेखर शर्मा यांना २० सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅप कॉल आला होता. या कॉलवर २० कोटींची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास पेटीएम वापरणाऱ्यांचा खाजगी डेटा लीक करण्याची धमकी देण्यात आली. कॉल करणाऱ्याने शर्मा यांना पेटीएमचा एक अकाऊंट नंबर दिला. या नंबरवर १५ ऑक्टोबर रोजी दोन लाख रुपयांची रक्कम ट्रांसफर केली होती. यानंतर शर्मा यांनी त्यांच्या धमकीला गंभीरतेने घेतले. विजय शर्मा यांचा भाऊ अजय शर्मा यांनी पोलिसांकडे याची तक्रार केली. कंपनीची उपाध्यक्षा सोनिया धवन आणि तिचा पती रूपक जैन यांनीच हा खंडणीचा फोन केला असल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्या बरोबर कंपनीचे काही कर्मचारीही सामील होते. सोनिया धवन ही मागील १० वर्षांपासून कंपनीत कार्यरत होती. कंपनीच्या कॉम्प्यूटरचा पासवर्ड माहिती असल्यामुळे सोनियाने खाजगी डेटा चोरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -