घरदेश-विदेशVIDEO: लॉकडाऊनचे उल्लंघन; नमाज अदा रोखल्याने पाकिस्तानी पोलिसांवर हल्ला

VIDEO: लॉकडाऊनचे उल्लंघन; नमाज अदा रोखल्याने पाकिस्तानी पोलिसांवर हल्ला

Subscribe

आदेशाचे पालन न केल्याने पाकिस्तानमधील पोलिसांनी मुस्लीम बांधवांना नमाज पठण करण्यास रोखल्याने त्यांच्यात झाला वाद

देशभरात कोरोनाचा धोका हा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरू नये म्हणून लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीत नागरिकांनी घरात सुरक्षित राहणं अपेक्षित असताना पाकिस्तानात मात्र वेगळाच प्रकार समोर आला. पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन असतानाही सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शुक्रवारी मुस्लीम बांधवांनी एकत्र येत गर्दी करून नमाज अदा केला. नमाज अदा करण्यासाठी एकत्र येऊन लॉकडाऊन आणि जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन या मुस्लीम बांधवांनी केले. यावेळी आदेशाचे पालन न केल्याने पाकिस्तानमधील पोलिसांनी मुस्लीम बांधवांना नमाज पठण करण्यास रोखल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि संतप्त मुस्लीमांनी पोलिसांवरच हल्ला केला.

संतप्त जमावाचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला

या वादाचे स्वरूप वाढल्याने जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला परंतू घटनास्थळी पोलिसांची टीम कमी असल्याने पोलिसांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान या हाणामारीची संपुर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये संतप्त जमावाने पोलिसांवर कसा जीवघेणा हल्ला केला हे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

जमावबंदी आणि लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याने आतापर्यंत १०० लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत २४५८ कोरोना रूग्ण असून त्यापैकी ७८३ रुग्ण हे कोरोना संशयित रूग्ण आहेत.


CoronaVirus: मध्य प्रदेशात तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकावरच दगडफेक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -