घरदेश-विदेशमोदींच्या पुतणीची पर्स पळवणारा २४ तासांत अटकेत! पोलीस मात्र ट्रोल!

मोदींच्या पुतणीची पर्स पळवणारा २४ तासांत अटकेत! पोलीस मात्र ट्रोल!

Subscribe

मोदींच्या पुतणीची पर्स सापडली आणि पोलीस झाले ट्रोल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स चोरणाऱ्या भामट्याला दिल्ली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोधून काढलं आहे. या व्यक्तीचं नाव नोनू असं असल्याचं समोर आलं आहे. नोनूला अटक करून दिल्ली पोलिसांनी त्याचा पाहुणचार एकीकडे सुरू केला असताना दुसरीकडे त्यांच्या या ‘कार्यक्षमते’वर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. १२ ऑक्टोबरला दमयंती बेन मोदी अमृतसरहून दिल्लीला परतल्या होत्या. दिल्लीमध्ये आपल्या घरी परतण्यासाठी त्यांनी ऑटो पकडली. मात्र, ऑटोमधून उतरत असताना एका चोरट्याने त्यांच्या हातातली पर्स हिसकून घेतली. या प्रकरणी त्यांनी लागलीच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी या भामट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.

- Advertisement -

कार्यक्षम कारवाई, तरीही ट्रोलिंग

दमयंती बेन मोदी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणी आहेत, हे समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने पावलं उचलली. सुमारे १०० पोलिसांच्या २० टीम या भामट्याच्या शोधात काम करत असल्याचं देखील सांगितलं गेलं. आणि अवघ्या २४ तासांमध्ये दिल्ली पोलिसांनी या भामट्याच्या मुसक्या आवळल्या. या चोराकडून पर्समधून घेतलेले ५६ हजार आणि दमयंती यांचा मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र, चोराला २४ तासांच्य आत पकडल्यानंतर देखील पोलीस ट्रोल होत असल्याचं पहिल्यांदा पाहायला मिळालं. मोदींच्या पुतणीच तक्रारदार असल्यामुळेच पोलिसांनी तातडीने कारवाई केली, अशी टीका नेटिझन्सकडून केली जाऊ लागली आहे.

- Advertisement -

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारमधले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी देखील चोरी झाली होती. मात्र, या चोरांना अद्याप पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांना टीका सहन करावी लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -