घरदेश-विदेशनववर्षाची खूशखबर! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

नववर्षाची खूशखबर! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नववर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी कपात होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने नेहमी चिंतेत असणार्‍या सर्वसामान्यांसाठी ही चांगली बातमी आहे. त्याशिवाय सरकारकडून मिथेनॉलयुक्त पेट्रोल विकण्याची परवानगी मिळताच पेट्रोल-डिझेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. कच्या तेलाच्या दरांत घट होवून जवळपास ७१ टक्क्यांची घसरण होण्याची चिन्हे आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण सुरू असून बुधवारी क्रूड ऑइल ५० डॉलर प्रति बॅरल दराने विकले जात होते. दोन ऑक्टोबर २०१८ मध्ये क्रूड ऑइल ८५.६ डॉलर प्रति बॅरलदराने विकले जात होते. तेव्हापासून आजपर्यंत कच्या तेलाच्या दरांत घट होऊन जवळपास ७१ टक्क्यांची घसरण झाली आहे.

- Advertisement -

मिथेनॉलयुक्त पेट्रोल उपलब्ध होणार

नीती आयोगाच्या देखरेखीखाली सरकार देशभरात 15 टक्के मिथेनॉल मिसळलेले पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. यासाठी पुण्यात चाचण्याही सुरू झाल्या आहेत. जर सरकारची योजना यशस्वी झाली तर पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मिथेनॉल कोळशापासून तयार केले जाते. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. इथेनॉल ऊसापासून तयार केले जाते. इथेनॉलसाठी प्रतिलीटर 42 रुपये खर्च होतात. तर मिथेनॉलसाठी 20 रुपये प्रती लिटर खर्च येतो. इथेनॉलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त असल्यानेच या पर्यायाचा विचार केला जात आहे. तसेच मिथेनॉलमुळे प्रदूषणही कमी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -