घरताज्या घडामोडीमागील दोन आठवडे पेट्रोल डिझेलच्या किंमती जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

मागील दोन आठवडे पेट्रोल डिझेलच्या किंमती जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

मुंबईत पेट्रोलचे दर हे ९७.५६ रुपये इतके आहेत. त्याचप्रमाणे डिझेलच्या किंमती या ८८.६० रुपये आहेत.

देशात काही महिन्यांपासून पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली होती. पेट्रोल दरवाढीवरुन लोक आक्रमक झालेले पहायला मिळाले. विरोधकांनीही केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला होता. संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ जैसे थे ठेवली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. रविवारी मुंबईत पेट्रोलचे दर हे ९७.५६ रुपये इतके आहेत. त्याचप्रमाणे डिझेलच्या किंमती या ८८.६० रुपये आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढ न झाल्याने ग्राहकांनाही किंचिंत दिलासा मिळाला आहे.

देशातील राज्यात पेट्रोलचे दर

दिल्ली

- Advertisement -

पेट्रोल: ९१.१७ रुपये लीटर
डिझेल: ८४.३५ रुपये लीटर

कोलकत्ता

- Advertisement -

पेट्रोल: ९१.३५ रुपये लीटर
डिझेल: ८४.३५ रुपये लीटर आहेत.

चेन्नईत पेट्रोलच्या किंमती ९३.१७ रुपये आणि डिझेलच्या किंमती ८५.४५ रुपये इतक्या आहेत. बंगळूरमध्ये पेट्रेलचे दर ९४.२२ रुपये आहेत. तर डिझेल ८६.३७ रुपये इतके आहे. भोपाळमध्ये रविवारी पेट्रोल ९९.२१ रुपये तर डिझेल ८९.७६ रुपये लीटर आहे.

सरकारने फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ केल्याने सर्वसामान्या लोकांना मोठा फटक बसला. पाहता पाहता पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली. त्यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली. गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली.


हेही वाचा – Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा गडगडले, चांदीही झाली स्वस्त

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -