घरदेश-विदेशPetrol Diesel Price: अखेर २५ दिवसांनी पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

Petrol Diesel Price: अखेर २५ दिवसांनी पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी ओलांडली होती. गॅस, खाद्यतेल दरवाढीबरोबरच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका सामान्यांना बसत होता. मात्र अखेर २४ दिवसानंतर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करत सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. आज पेट्रोल १८ पैश्यांनी तर डिझेलचे दर १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे दर ९७.४० रुपये प्रति लीटर इतके तर डिझेल ८८.४२ रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच दिल्लीत पेट्रोल ९०.९९ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ८१.३० रुपये झाले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल ९३ रुपयांवर पोहचले आहे. तर कोलकत्तामध्ये पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त होत ९१.१८ रुपयांवर पोहले आहे.

प्रत्येत दिवशी सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमधील फेरबदल जाहीर होतो. त्यामुळे प्रत्येत दिवशी जाहीर झालेल्या दरनुसार पेट्रोल-डिझेलची रक्कम घेतली जाते. परंतु सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर एक्साइ़ज ड्युटी, डिलर कमिशन, आणि अन्य कर लागू होत असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर दुप्पट झाले आहे. मात्र आज २४ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याने नागरिकांनी दिलासा मिळत आहेत.

- Advertisement -

‘या’ दोन राज्यात पेट्रोल शंभरी पार

फेब्रुवारी महिन्यात राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे. आजही राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचे दर १९ पैशांनी स्वस्त होत १०१.५६ रुपये लीटरवर पोहचले आहे. त्यामुळे देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानमध्ये विकले जात आहे. तर डिझेल १७ पैशांनी स्वस्त होत ९३.६० रुपये प्रति लीटर झाले आहे. तर मध्यप्रदेशच्या अनूपपुरमध्ये पेट्रोल १०१ रुपये पार आहे. तर डिझेल ९२ रुपये प्रति लीटर झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -