घरमनोरंजनकार्तिक आर्यनच्या 'फ्रेडी' चित्रपटाचा फर्स्ट लूक

कार्तिक आर्यनच्या ‘फ्रेडी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘फ्रेडी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. कार्तिकचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कार्तिकने नुकताच फ्रेडी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक सोबत अलाया फर्नीचरवाला देखील दिसून येणार आहे.

कार्तिकच्या ‘फ्रेडी’चा फर्स्ट लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ‘फ्रेडी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये एका कासवावर एक आर्टिफिशियल दात दिसून येत आहे आणि त्या दातांमध्ये गुलाबाचे फुल देखील आहे. कार्कितने या पोस्टर खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “फर्स्ट लूक पोस्टर येत आहे.” तर दुसऱ्या पोस्टमध्ये कार्तिकने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कार्तिकने चश्मा घातला असून त्याचा चेहरा गंभीर दिसत आहे. तसेच त्याच्या हातामध्ये आर्टिफिशियल दात दिसत आहेत आणि त्याच्या हातामध्ये रक्त लागलेलं आहे. कार्तिक आर्यनने खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “डॉक्टर फ्रेडी गिनवाला, अपॉइंटमेंट लवकरच सुरु होणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

 

कार्तिक आर्यनचं दिग्दर्शन शशांक घोष यांनी केलं असून एकता कपूरने त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. कार्तिक आर्यनने सांगितलं की, या चित्रपटाचा भाग बनून तो खूप खूश आहे. ‘फ्रेडी’ चित्रपटाव्यतिरिक्त’कॅप्टन इंडिया’, ‘सत्यप्रेम की कथा’ आणि ‘आशिकी 3’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.

 


हेही वाचा :

अमृता सुभाषने दिली गोड बातमी; चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -