घरदेश-विदेशPfizer, BioNTech ने 5 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी मागितली परवानगी

Pfizer, BioNTech ने 5 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी मागितली परवानगी

Subscribe

यामुळे कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक सार्वजनिक आरोग्य सुरक्षित होणार असल्याचेही कंपन्यांनी म्हटले आहे.

Pfizer आणि BioNTech कंपनीने 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दोन डोसच्या लसीसाठी आपत्कालीन वापराची परवानगी मागितल्याचे  मंगळवारी सांगितले आहे. या फार्मास्युटिकल कंपन्यांनी सांगितले की, त्यांनी एजन्सीच्या विनंतीनंतर यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनला डेटा सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत EUA सबमिशन पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय ते युरोपियन मेडिसिन एजन्सी आणि जगभरातील इतर एजन्सींना क्लिनिकल चाचणी डेटा देखील सबमिट करणार आहेत.

अमेरिकेची लस निर्माता कंपनी Pfizer आणि जर्मनीची BioNTech यांनी मिळून ही एक नवी लस तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी Pfizer आणि BioNtech यांनी या लसीच्या क्लिनिकल चाचण्याही सुरू केल्या आहेत.

- Advertisement -

FDA ची लस सल्लागार समितीने 15 फेब्रुवारीला कंपन्यांच्या या सबमिशनवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. सुरक्षा आणि परिणामकारकता यातील महत्त्वाचा भाग असल्याचे फिलाडेल्फियाच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील लस शिक्षण केंद्राच्या समितीचे सदस्य आणि संचालक डॉ. पॉल ऑफिट यांनी सांगितले. यावेळी अमेरिकन लोकांचा आत्मविश्वास यावर अवलंबून आहे की, ते आपल्या मुलांना ही लस देऊ इच्छितात का?,” असेही ऑफिट यांनी सांगितले.

- Advertisement -

Pfizer/BioNTech लस 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या वापरण्यासाठी अधिकृत असून सर्वात लहान मुलांसाठी उपलब्ध असलेली ही पहिली कोविड-19 लस असेल. यामुळे कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक सार्वजनिक आरोग्य सुरक्षित होणार असल्याचेही कंपन्यांनी म्हटले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -