घरCORONA UPDATEचिंता नको! भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर - पंतप्रधान

चिंता नको! भारताची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर – पंतप्रधान

Subscribe

देश आता पूर्वपदावर येत असून इतर काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती नियंत्रणात आहे.

देशभरात अद्याप कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातल्या काही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. नागरिकांनी कोरोनाबाबतीत नियमांचं पालन केलं तर कोरोनाला सहज रोखता येईल आणि अर्थव्यवस्था रुळावर येईल. कोरोनाला रोखायचं असेल तर नागरिकांनी नियमांचं पालन करावं. नियमांचं पालन केलं तर कमी नुकसान होईल.  मास्कशिवाय घराबाहेर पडणे सगळ्यात धोकादायक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणाले. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात देशातील काही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

तर अर्थव्यवस्था रूळावर येईल

जेवढे लोक नियमांचं पालन करतील तेवढं कोरोनाला रोखता येईल. आणि हे झालं तरच अर्थव्यवस्था रुळावर येईल. आता भारताची निर्यात वाढत आहे. कारखाने सुरू झाले आहेत. लोक कामावर जात आहेत. मात्र हे संकट मोठं असल्याने सगळ्यांनीच काळजी घ्यावी असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

देश आता पूर्वपदावर येत असून इतर काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाला रोखता येणार नाही. अनलॉक करून २ आठवडे झाले, या काळातला आपला अनुभव भविष्यात फायदेशीर ठरू शकेल. आज मला तुमच्याकडून कोरोना संसर्गाबाबतची वास्तविकता कळेल, आपल्याकडून मांडलेले विचार या साथीचा नाश करण्यासाठी पुढील धोरणांमध्ये मदत करतील. गेल्या काही आठवड्यांत विदेशात अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना पुन्हा देशात परत आणले गेले आणि बर्‍याच स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी परत आणले गेले. बहुतेक सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या पद्धती पुन्हा सुरू झाल्या आहेत, परंतु भारतातील करोना इतर देशांइतके तितकेसे प्रभावित झाले नाही.

भारतात, कोरोना विषाणूचा पुनर्प्राप्ती दर म्हणजे आता ५० टक्के झाला आहे. आपण भारतीय मरणार हे योग्य नाही; पण कोरोनामुळे कमी मृत्यू झालेल्या देशांपैकी भारत हा एक देश आहे हेही खरं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – मास्कशिवाय घराबाहेर पडणे धोकादायक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -