घरताज्या घडामोडी'मालिकेच्या सेटवर हालगर्जीपणा कराल तर...', अमेय खोपकरांनी दिला इशारा!

‘मालिकेच्या सेटवर हालगर्जीपणा कराल तर…’, अमेय खोपकरांनी दिला इशारा!

Subscribe

‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील २७ कलाकार व क्रू मेंबर्संना कोरोनाची लागण झाली. याच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आ मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनं इशारा दिला आहे.

या घटनेनंतर पुन्हा एकदा कलाकारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. हलगर्जीपणामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे. कोरोनामुळे राज्यातील सिनेमा, मालिकांचे शुटींग चार ते पाच महिने पूर्णपणे बंद होते. त्यानंतर सरकारने सशर्त चित्रीकरणाला परवानगी दिल्या नंतर मालिकांच्या शुटींगला सुरूवात झाली.

- Advertisement -

‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवरील अनेकांना करोनाची लागण झाल्याने १५ सप्टेंबर रोजी मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यामध्ये पार पडत होतं. मात्र आता मुंबईतील फिल्म सिटीमध्ये चित्रीकरण करण्यात येणार असल्याचं समजतंय.

- Advertisement -

अमेय खोपकर म्हणाले, हिंदीतील विध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासन करेलच, मात्र आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे सर्वतोपरी पालन करणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसंच मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायला हवं. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जी केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर ‘मनचिसे’ मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल’, असं खोपकरांनी स्पष्ट केलं.


हे ही वाचा – ‘मला मदत करा’, खासदार नुसरत जहाँ यांनी मागितली पोलिसांकडे मदत!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -