घरदेश-विदेशपाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, २६ जुलै रोजी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र आजचा दिवस खास असून त्यांनी कारगिल युद्धातील जवानांचे स्मरण मन की बातच्या सुरूवातीला केले असून या युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली आहे. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६७ वा एपिसोड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांच्या शौर्याला नमन केले. त्यांनी मन की बात कार्यक्रमातून सांगितले की, त्यावेळी भारत पाकिस्तानसोबत मैत्री करू इच्छित होता. मात्र पाकिस्तानने मोठाले मंसूबे ठेवत, कारगिल युद्ध करण्याचे धाडस केले. मात्र या युद्धात भारताच्या खऱ्या शौर्याचा विजय झाला.

कारगिलचे युद्ध ज्या परिस्थिती झाले ते भारत कधीही विसरू शकणार नाही. पाकिस्ताने भारताची जमिन बळकवण्याच्या उद्देशाने तसेच अंतरीक कलह निर्माण करण्याच्या हेतूने हे युद्ध करण्याचे धाडस केले. दुष्टाचा स्वभावच विनाकारण शत्रुत्व निर्माण करण्याचा असतो असे त्यांनी यावेळी पाकिस्तानसाठी म्हटले. पाकिस्तान आजवर असेच करत आला आहे. अशा स्वभावाच्या लोकांचे जे चांगले चिंततात ते त्यांचे नुकसान करतात. त्यामुळे भारताने केलेल्या मैत्रिच्या पुढाकाराच्या बदल्यात पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजिर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यानंतर भारताने जो पराक्रम केला तो संपूर्ण जगाने पाहिला, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्यावेळी मलादेखील कारगिलला जाऊन वीर जवानांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले होते. ते क्षण आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण होते, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केले. तसेच देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा, हा महात्मा गांधी यांचा अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेला विचार पंतप्रधानांनी आज बोलून दाखवला. शिवाय सध्या संपूर्ण जगाला कोरोनाच्या आजाराने ग्रासले असताना देशातील कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा –

रोज ५ वेळा म्हणा, हनुमान चालीसा; कोरोना होईल बरा- साध्वी प्रज्ञा ठाकूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -