Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पातून गरिबांची, मध्यमवर्गीयांची स्वप्ने पूर्ण होणार – पंतप्रधान मोदी

यंदाचे केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 देशातील मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी यांसह सर्वांचे स्वप्न पुर्ण करणार आहे. या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यंदाचे केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 देशातील मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी यांसह सर्वांचे स्वप्न पुर्ण करणार आहे. या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. परंपरेने स्वत:च्या हाताने देशासाठी कष्ट करणारे ‘विश्वकर्मा’ हे या देशाचे निर्माते आहेत. पहिल्यांदाच ‘विश्वकर्मा’च्या प्रशिक्षण आणि सहाय्याशी संबंधित योजना अर्थसंकल्पात आणण्यात आली आहे. पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान म्हणजेच पीएम विकास करोडो विश्वकर्मांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. (pm narendra modi on union budget 2023 24 full pm narendra modi speech)

भारतातील महिलांचे आयुष्य सोपे करण्यासाठी गेल्या काही वर्षांत सरकारने अनेक पावले उचलली. यासह महिला बचत गट हे एक सामर्थ्यशाली क्षेत्र भारतात पसरू लागले आहे. त्यांना थोडंसे पाठबळ मिळालं, तर त्या जादू करून दाखवू शकतात. त्यामुळे महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पात नवी तरतूद करण्यात आली आहे. महिलांसाठी विशेष बचत योजना सुरू केली जात आहे. या योजनेमुळे सामान्य महिलांना मोठी ताकद मिळणार आहे.

कृषी क्षेत्रातील डिजिटल पेमेंटच्या यशाची आपल्याला पुनरावृत्ती करायची आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळे या अर्थसंकल्पात आम्ही डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी खूप मोठी योजना आणली आहे. ते म्हणाले, “वर्ष 2014 च्या तुलनेत पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक 400 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. यावेळी पायाभूत सुविधांवर 10 लाख कोटी रुपयांची अभूतपूर्व गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीमुळे तरुणांसाठी रोजगार आणि मोठ्या लोकसंख्येसाठी उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील”

टॅक्स स्लॅबबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारतातील मध्यमवर्ग हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एक प्रमुख प्रवाह आहे. समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मध्यमवर्ग ही मोठी शक्ती आहे. या वर्गाला सक्षम करण्यासाठी आम्ही कराचे दर कमी केले आहेत.

“मी देशवासीयांना आवाहन करतो की या, एक नवा अर्थसंकल्प तुमच्यासमोर आहे. नवा संकल्प घेऊन वाटचाल करुया. २०४७ मध्ये प्रत्येत अर्थाने संपन्न भारत आपण बनवुया, चला, या यात्रेला आपण पुढे चालवू”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


हेही वाचा – Budget 2023: निर्मला सीतारामन यांचं सर्वांत लहान भाषण, फक्त ८७ मिनिटांत अर्थसंकल्प सादर