घरअर्थजगतBudget 2023: निर्मला सीतारामन यांचं सर्वांत लहान भाषण, फक्त ८७ मिनिटांत अर्थसंकल्प...

Budget 2023: निर्मला सीतारामन यांचं सर्वांत लहान भाषण, फक्त ८७ मिनिटांत अर्थसंकल्प सादर

Subscribe

Budget 2023 Speech | या सर्व बाबींकडे लक्ष असतानाच निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या कार्यकाळातील सर्वांत लहान भाषण केलं आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षांत त्यांनी फक्त ८७ मिनिटे भाषण केलं.

Budget 2023 Speech | नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून महिला, वयोवृद्ध, तरुण आणि नोकरदार वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसंच, सात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना करातून दिलासा देण्यात आला आहे. या सर्व बाबींकडे लक्ष असतानाच निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या कार्यकाळातील सर्वांत लहान भाषण केलं आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षांत त्यांनी फक्त ८७ मिनिटे भाषण केलं.

२०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०१९-२० चं पहिलं अर्थसंकल्प सादर केलं होतं. त्यांनी त्यावेळी सर्वाधिक लांबलाचक भाषण केलं होतं. अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळ भाषण करण्याचा त्यांना रेकॉर्ड तोडला होता. ते भाषण २ तास १७ मिनिटे चाललं होतं.

- Advertisement -

त्यानंतर, २०२०-२१ सालातील भाषण दोन तास ४२ मिनिटे चालले होते. भाषण करतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी ते भाषण आटोपतं घेतलं होतं. तर, २०२१-२२ या वर्षांतील अर्थसंकल्पीय भाषण १०० मिनिटे होतं. तर, आजचं अर्थसंकल्पीय भाषण अवघ्या १ तास ८७ मिनिटेच चालले. म्हणजे हे अर्थसंकल्पीय भाषण फक्त दीड तास होते.

जसवंत सिंह यांचं भाषणही मोठं

- Advertisement -

निर्मला सीतारामन यांच्या आधी भाजपा नेता जसवंत सिंह यांनी सर्वांत लांबलाचक अर्थसंकल्पीय भाषण केलं होतं. २००३ मध्ये त्यांनी २ तास १५ मिनिटे भाषण केलं होतं.

सर्वांत लहान भाषण कोणाचं?

स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वांत लहान भाषण १९७७ साली हिरुभाई एम पटेल यांचं ठरलं होतं. त्यांनी केवळ ८०० शब्दांत अंतरिम बजेट सादर केला होता.

कोणी कितीवेळा सादर केला अर्थसंकल्प

मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक जास्त वेळा म्हणजेच १० वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. यानंतर पी.चिदंबरम यांनी नऊ वेळा, प्रणव मुखर्जी यांनी ९ वेळा, यशवंतराव चव्हाण यांनी सातवेळा, सी.डी.देशमुख यांनी सातवेळा, यशवंत सिन्हा यांनी सातवेळा, मनमोहन सिंह यांनी सहावेळा, टी.टी.कृष्णमाचारी यांनी सहावेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -