घरट्रेंडिंगViralVideo: पंतप्रधान मोदींनी शेअर केले मोढेराच्या सूर्य मंदिराचे पावसातील मनमोहक दृश्य

ViralVideo: पंतप्रधान मोदींनी शेअर केले मोढेराच्या सूर्य मंदिराचे पावसातील मनमोहक दृश्य

Subscribe

गुजरातमध्ये संततधार पाऊस पडत असताना एक व्हिडिओ समोर आला आहे जो अत्यंत मनमोहक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मोढेराच्या सूर्यमंदिराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, मुसळधार पावसात आपल्याला मोढेराच्या सूर्यमंदिराचे आश्चर्यकारक आणि नेत्रदीपक दृश्य पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यासंदर्भातील घटनांमध्ये बरीच लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

गुजरातमधील पाऊस आणि झालेल्या विनाशादरम्यान हा व्हिडिओ आनंददायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘मोढेराचे मूर्तिपूजक सूर्य मंदिर पावसाळ्याच्या दिवसात नेत्रदीपक दिसते.’ या व्हिडिओमध्ये जोरदार पाऊस होताना देखील दिसत आहे.

- Advertisement -

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात मोढेरा नावाच्या खेड्यात पुष्पावती नदीच्या काठावर मोढेरा सूर्य मंदिर आहे. हे ठिकाण पाटणच्या दक्षिणेस ३० किलोमीटर अंतरावर असून हे सूर्य मंदिर भारतातील अद्वितीय वास्तुकला आणि कलेचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे मंदिर १०२६-१०२७ मध्ये सोलंकी वंशातील राजा भीमदेव प्रथम यांनी बनवले होते. सध्या ते भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे आणि या मंदिरात पूजा करण्यास मनाई असल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

दरम्यान, गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर सुमारे १,४०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये वार्षिक सरासरीच्या १०६.७८ टक्के पाऊस झाला आहे.


कोरोनाचा फैलाव झाला कमी; १२ दिवसात १ कोटी कोरोना टेस्ट: आरोग्य मंत्रालयाचा दावा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -