घरताज्या घडामोडीसिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंना कोरोनाची बाधा

सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंना कोरोनाची बाधा

Subscribe

कोरोनाचा शिरकाव आता राजकीय नेते मंडळींमध्येही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. कोल्हापुरातील चार आमदारांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असताना आता सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोकाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी आता कोरोना संसर्गावर मात केली आहे. त्या पाठोपाठ आता कोकाटेंचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोकाटे यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील विश्वसनीय सूंत्रानी दिली आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

लोकप्रतिनिधींचा वेगवेगळ्या कामानिमित्त अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे आता राजकीय मंडळींमधील कोरोनाचा धोका अधिक घट्ट होताना दिसत आहे. ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अस्लम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक कोरोना अपडेट

  • पॉझिटिव्ह रूग्ण- ३०,००९ (मृत-७६८)
  • नाशिक ग्रामीण- ७,४३३ (मृत-२१२)
  • नाशिक शहर- २०,०७४ (मृत-४२९)
  • मालेगाव शहर- २,२९८ (मृत-१०५)
  • जिल्ह्याबाहेरील- २०४ (मृत-२२)

 

- Advertisement -

हेही वाचा – Corona : नाशिकमध्ये कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ३० हजारपार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -