घरताज्या घडामोडीदेशभरात १५०० पेक्षा अधिक ऑक्सिजन प्लांट सुरू करणार - पंतप्रधान मोदी

देशभरात १५०० पेक्षा अधिक ऑक्सिजन प्लांट सुरू करणार – पंतप्रधान मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी देशभरातील सध्याचा साठा आणि त्याच्या वाढीबाबत एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. व्हर्च्युअल आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पीएमकेअर्स अंतर्गत पीएसए (Pressure Swing Operation) ऑक्सिजन प्लांट इंस्टॉलेशनबाबत आढावा घेतला. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ‘देशभरात १५०० पेक्षा अधिक PSA ऑक्सिजन प्लांट सुरू केले जात आहे. पीएम केअर्सद्वारे दिले गेलेले PSA ऑक्सिजन प्लांटद्वारे ४ लाखांहून अधिक ऑक्सिजनयुक्त बेडचा आधार मिळेल.’ लवकरात लवकर याची अंमलबजावणी करण्यास मोदींनी सांगितले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी सरकारने देशांमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी खूप मोठी योजना तयार केली आहे. यामध्ये ऑक्सिजनचे उत्पादन आणि पुरवठासंबंधीत पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवड्यासह रुग्णालय आणि मेडिकलमध्ये आरोग्य संबंधित उपकरणांची कमतरता जाणवली. त्यामुळे पुन्हा असे होऊ नये यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक बोलावली आहे. यापूर्वी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, एका छोट्याशा चुकीमुळे मोठे परिणाम होऊ शकतात आणि महामारीसोबत सुरू असलेली लढाई कमकुवत होऊ शकते.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनी २६ जूनला देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेबद्दल आणि कोरोना संसर्गाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लसीकरण मोहिमेच्या गतीबद्दल मोदींनी समाधान व्यक्त केले.


हेही वाचा – Coronavirus vaccination: कोरोना लस घेतल्यानंतर हात का दुखतो? जाणून घ्या कारण


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -