घरताज्या घडामोडीगोकुळ दुधाच्या दरात पुन्हा वाढ, ११ जुलैपासून नव्या दराची अंमलबजावणी

गोकुळ दुधाच्या दरात पुन्हा वाढ, ११ जुलैपासून नव्या दराची अंमलबजावणी

Subscribe

गोकुळ दूध संघाच्या खरेदीमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केला. नव्या दराची अंमलबजावणी ही येत्या ११ जुलैपासून लागू होईल असेही सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. दूध खरेदीदर वाढीमुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे, पण सर्वसामान्यांना मिळणारे दूध मात्र या निर्णयामुळे महागणार आहे. गोकुळच्या म्हशीच्या दुधाला प्रति लिटरसाठी २ रूपये तर गायीच्या दुधासाठी १ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळची सत्ता हाती येताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणार असे नेत्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसारच आज झालेल्या दरवाढीमुळे दूध उत्पादकांना दिलेला शब्द हा संचालक मंडळाने पुर्ण केला आहे. कोल्हापूर वगळता ही दूधाची दरवाढ संपुर्ण राज्यात लागू असणार आहे.

गोकुळ दूध संघ सध्या शेतकऱ्यांना ३९ रूपये तर गाईच्या दुधासाठी २६ रूपये दर देत आहे. या दरामध्ये वाढ करत आता म्हशीच्या दूधासाठी ४१ रूपये देण्यात येणार आहेत. तर गाईच्या दुधाला २८ रूपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण सर्वसामान्यांना मात्र या दरामुळे कोरोनाच्या आर्थिक संकटात आणखी एका नव्या दरवाढीची भर पडणार आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -