घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार शेतकऱ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार शेतकऱ्यांशी संवाद

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

केंद्र सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केली. तसेच सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. मात्र, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाकडे लक्ष देत मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला म्हणजेच देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

कृषी कायद्यांमधली वैशिष्ट्ये समजून सांगणार

शेतकऱ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कायद्यांमधील वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यकर्ते हे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी अयोध्येत शेतकऱ्यांसोबत जोडलं जाण्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे. अयोध्येत एकूण ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकऱ्यांसाठी संवाध साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा – कोरोना झाल्याचे लपवून केला प्रवास, विमानातच झाला मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -