घरदेश-विदेशकोरोना झाल्याचे लपवून केला प्रवास, विमानातच झाला मृत्यू

कोरोना झाल्याचे लपवून केला प्रवास, विमानातच झाला मृत्यू

Subscribe

प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे लक्षात येताच विमानात एकच खळबळ

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असून अमेरिकेत या व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क लावणं, गर्दी करणं टाळणं या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत विमान प्रवास करताना प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाला होता मात्र त्याने ही बाब लपवून विमान प्रवास केला. या प्रवासातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रवाशाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे लक्षात येताच विमानात एकच खळबळ उडाली.

असा घडला प्रकार

६९ वर्षीय प्रवासी ओर्लांडो, फ्लोरिडाहून लॉस एंजलिसला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होता. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच त्याला अस्वस्थ वाटू लागले. शरीर थरथरत होते, त्याशिवाय श्वास घेण्यासही त्रास जाणवत होता. न्यू ओरलियन्समध्ये विमानाचे आपात्कालीन लँडिंग करण्यात आले. तेथून या व्यक्तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी या प्रवाशाला मृत घोषित केले.

- Advertisement -

या प्रवाशाला कोरोनाची लक्षण असल्याचे जाणवले होते. त्याला चव न कळणे , वास न येणे य़ासारखी कोरोनाची लक्षण दिसत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितल्याचे वृत्त एबीसी न्यूजने दिले होते. हा प्रवासी विमान प्रवास करत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले, तसेच विमानात प्रकृती ढासळल्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखळ करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचे घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, त्या प्रवाशाची कोरोना चाचणी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र आठवडाभराने अहवाल आल्यानंतर या व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.


आयएमए राज्य कार्यकारिणी जॉईंट सेक्रेटरीपदी डॉ. चंद्रात्रे, नाशिकला प्रथमच बहुमान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -