घरदेश-विदेशपंजाब पोलिसांचा ढिसाळ कारभार; सुधीर सुरींच्या हत्येची आधीच मिळाली होती खबर

पंजाब पोलिसांचा ढिसाळ कारभार; सुधीर सुरींच्या हत्येची आधीच मिळाली होती खबर

Subscribe

अलर्ट मिळूनही सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्या आणि सुधीर सुरी यांना जीव गमवावा लागला.

पंजाबमधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पंजाब पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत मोठा खुलासा झाला आहे. पंजाबमधील एका हिंदू नेत्याच्या हत्येची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. अलर्ट मिळूनही सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्या आणि सुधीर सुरी यांना जीव गमवावा लागला.

सुधीर सुरी यांना खलिस्तानी गटाकडून आधीच धमक्या येत होत्या. या धमक्यांबाबत पोलिसांना इशारा देण्यात आला होता, त्यामुळे पोलिसांनी 28 ऑक्टोबर रोजी राज्य स्पेशल ऑपरेशन सेल (SSOC) पोलिस ठाण्यात राजकीय नेते आणि हिंदू नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या परदेशात बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

या प्रकरणात 10 जणांची नावे समोर आली आहेत, तर त्यात एक अज्ञात आहे. पंजाबमध्ये हिंदू नेत्यांची हत्या करणाऱ्यांची नावे पोलिसांकडे होती. असे असतानाही पोलिसांनी हे प्रकरण हलक्यात घेतले आणि खुलेआम एका हिंदू नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

पाकिस्तान आणि कॅनडात असलेल्या दहशतवाद्यांशी संबंध
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये ज्या व्यक्तींची नावे आहेत ते पाकिस्तान आणि कॅनडात असलेल्या हरविंदर सिंग आणि लखबीर सिंग या दहशतवाद्यांशी संबंधित आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पंजाबमधील हिंदू नेत्यांच्या हत्येची जबाबदारी या लोकांवर सोपवली आहे. पक्की माहिती असूनही पोलीस शिवसेना नेते सुधीर सुरी यांना वाचवू शकले नाहीत. पाकिस्तानातून पाठवलेली शस्त्रास्त्रे राज्यातील विविध जिल्ह्यात पोहोचवण्यातही आरोपींचा हात होता या आरोपींवर अनेक गुन्हे आहेत.

- Advertisement -

परदेशात असलेले दहशतवाद्यांकडून शस्त्र पुरवठा
एफआयआरनुसार, परदेशात असलेले दहशतवादी गुरपिंदर सिंग, गुरप्रीत सिंह, दीपक कुमार त्यांच्या अनेक अज्ञात साथीदारांना बेकायदेशीरपणे शस्त्रे पुरवत होते. त्यांना परदेशातून त्यासाठी निधी मिळत होता. परदेशात असलेले दहशतवादी पंजाबमध्ये गुन्हे करून पळून गेलेल्यांना वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करत होते. पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण व्हावी, पंजाबमध्ये दंगल होऊन शांतता बिघडवी, या उद्देशाने पाकिस्तानी एजन्सी आयएसआयच्या सूचनेनुसार हे लोक पंजाबमधील विविध सामाजिक आणि धार्मिक गटांच्या नेत्यांना लक्ष्य करत होते.

एफआयआरमध्ये नोंदविलेली नावे
कोमलप्रीत सिंगच्या तक्रारीवरून मोहालीच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हरीके तरनतारन , तरसेम सिंग (दुबई), जगरूपसिंग उर्फ ​​रूप रा.लोधीपूर (अमेरिका), अमृतपाल सिंग उर्फ ​​अमी रा.चांद निवास बाघापुराना (मोगा) (फिलीपिन्स), मनप्रीतसिंग उर्फ ​​पीटा रा.बुईया वाला जीरा फिरोजपूर (फिलिपिन्स), हरजोतसिंग रा.जंद वाला मिरा खुशी खेडा फाजिल्का (अमेरिका), हरप्रीतसिंग उर्फ ​​हॅप्पी रा.दखली तलवंडी निपाला मखू फिरोजपूर ( अमनदीप सिंग इटाली, अमेरीका) अशी अटक करण्यात आली आहे. (मलेशिया), गुरपिंदर सिंग उर्फ ​​पिंडू रा. भुरा कोहना खेम कलान , गुरप्रीत सिंग उर्फ ​​गोपी, भुरा कोहना खेम कलान , दीपक कुमार सुरखपूर झज्जर अशी अज्ञात्यांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे.

या कलमान्वये गुन्हा दाखल
स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (SSOC) ने आरोपींविरुद्ध कलम 153, 153A, 212, 216, 120B IPC आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एसएसओसी या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नाही.


हे ही वाचा – न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे 50वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली पदाची शपथ

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -