Wednesday, June 16, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग Post covid-19 diet : सावधान ! कोरोनामुक्तीनंतर भुक वाढलेय ? कारण वाचा

Post covid-19 diet : सावधान ! कोरोनामुक्तीनंतर भुक वाढलेय ? कारण वाचा

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या महामारीत दुसऱ्या लाटेचे अधिक रौद्र रूप भारतात दिसून आले आहे. पण या संकटाच्या काळातही अनेकांनी कोरोनावर मात देण्यासाठीची हिंमत दाखववली आहे. नवीन संसर्ग झालेल्या रूग्णांच्या तुलनेत आता अनेक राज्यात कोरोनावर उपचार घेऊन बर होणाऱ्यांचा आकडाही मोठा होत चालला आहे. कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्ती मिळवळणाऱ्यांचा आकडाही आता समाधानकारक येत आहे. पण कोरोनामुक्तीनंतरच्या शरीरातील बदलांमध्ये काही गोष्टी या प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यामध्ये एक गोष्ट जाणवते आहे ती म्हणजे भूख. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये एरव्ही लागणाऱ्या भुकेच्या तुलनेत अधिक भूक लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ही भूक लागण्याचा विषय अनेकांसाठी चिंतेचा ठरत आहे. पण ही भूक का लागत आहे ? याचीही कारणे आता समोर येत आहेत.

वास न येणे, चव न लागणे

कोरोनाचा संसर्ग जेव्हा एखाद्या रूग्णाला होतो, तेव्हा सर्वात प्रथम आढळणाऱ्या लक्षणांमध्ये एक महत्वाचे लक्षण म्हणजे चव न लागणे, वास न येणे. या दोन्ही लक्षणांमुळेच कोरोनाबाधित रूग्णांच्या आहारावर परिणाम होतो. अनेकांना जेवणच जात नाही, अशाही तक्रारी समोर आल्या आहेत. पण जेव्हा चव आणि वास यासारख्या गोष्टी उपचारानंतर सुरळीत होतात, तेव्हा शरीराची भूक वाढल्याचा अनेक रूग्णांचा अनुभव आहे. या लक्षणांमुळेच भूकेचे संकेत अधिक मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात. ही लक्षण एक दोन दिवसात ठिक झाली तर चांगलेच संकेत आहेत. पण हे भूकेचे लक्षण आणखी काही कालावधी राहिले म्हणजे ही सगळी मधुमेह (diabetes) असण्याची लक्षणे आहेत. त्याशिवाय जेवणाचा अतिसारही हे एक लक्षण आहे.

अशक्तपणा हेदेखील एक लक्षण

- Advertisement -

कोरोनाने गंभीर असलेल्या रूग्णांमध्ये भुकेत वाढ झाल्याचे आढळलेले नाही. कोरोनाची सौम्य लक्षणे तसेच एसिंप्टोमॅटिक रूग्णांमध्ये भूक वाढते. जेव्हा कोरोनाचे संक्रमण शरीरात होते, तेव्हा रूग्ण भरपूर अशक्त होतो. जेव्हा कोरोनातून रूग्ण बरा बोतो, तेव्हा तो अशक्तपणा भरून निघताना अधिक भूक लागत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच शरीरात स्थूलताही वाढू शकते असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. म्हणूनच कोरोनातून बरे झाल्यानंतर डाएट ठेवणे गरजेचे आहे. संतुलित आहार ठेवल्याने शरीराच्या स्थूलतेवर नियंत्रण ठेवता येते. जेव्हा अनेक दिवस उलटूनही जास्त भूक लागणे थांबत नाही, तेव्हा मात्र तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. कारण जास्त भूक लागणे हे एका आजाराचे लक्षण आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणता आहार घ्याल ?

– हाय प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार
– डाळी आणि मोड आलेली कडधान्ये
– भाजी चपाती आणि भाताचा संतुलित आहार
– फळांचे सेवन


- Advertisement -

 

- Advertisement -