घरदिवाळी 2023अयोध्येतील दीपोत्सवाला दारिद्र्याची किनार, पणत्यामधील तेल घेण्यासाठी गरीबांची गर्दी

अयोध्येतील दीपोत्सवाला दारिद्र्याची किनार, पणत्यामधील तेल घेण्यासाठी गरीबांची गर्दी

Subscribe

लखनऊ : अयोध्येतील दीपोत्सवाची चर्चा जोरदार रंगली आहे. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स्’मध्ये त्याची नोंद घेतली गेली आहे. पण त्याची एक दुसरी बाजूही समोर आली आहे. या दिव्यांच्या झगमगाटाला दारिद्र्याची किनारही असल्याची समोर आले आहे.

हेही वाचा – कधी काय होईल सांगू शकत नाही, म्हणून आम्ही गॅसवर असतो…- मुख्यमंत्री शिंदेंची ‘मन की बात’

- Advertisement -

यावर्षी अयोध्येमध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्या धाममध्ये एकाच वेळी 22 लाख 23 हजार दिवे लावण्याचा विक्रम करण्यात आला. शेकडो स्वयंसेवकांच्या चमूने अथक परिश्रम घेऊन 24 लाख दिवे लावण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी 18 लाख 81 हजार दिवे लावण्याचा विक्रम होता, तो मोडून यंदा दीपोत्सव कार्यक्रमात 22 लाख 23 हजार दिवे लावण्याचा नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. या विक्रमाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमने प्रमाणपत्र दिले.

- Advertisement -

या दीपोत्सव कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांच्यासह, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रिजेश पाठक यांच्यासह अनेक नेते आणि 50हून अधिक देशांचे राजदूत सहभागी झाले होते. सरयू नदीच्या घाटावर लेझर शोच्या माध्यमातून रामलीला दाखवण्यात आली होती.

हेही वाचा – मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात ठाकरे, फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे पिछाडीवर

पण आता या दीपोत्सव आणि लेझर शोच्या झगमगाटात उत्तर प्रदेशमधील दारिद्र्याची एक काळी बाजू देखील उजेडात आली आहे. ज्या पणत्यांमधील वात पेटली नाही किंवा त्या लगेच विझल्या त्यातील तेल घेण्यासाठी गरीबांची गर्दी झाली होती. त्यात मुले आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. एका स्थानिक वृत्तवाहिनींनी त्यांच्याशी संवाद साधला असता, तेथील गरीबीची मन हेलवणारी स्थिती उघड झाली. एका महिलेने हे तेल मुलाच्या डोळ्यांसाठी जमा करत असल्याचे सांगितले त्याच्या डोळ्याला इजा झाली असून या तेलाने त्याला मसाज करेन, असे ती म्हणाली.

तर, अन्य एका महिलेने हे तेल घरी नेहमीच्या वापरासाठी नेत असल्याचे सांगितले. आम्ही मजूर असून रोज मजुरी मिळतचे असे नाही. त्यामुळे कधी-कधी आम्हाला उपाशीपोटी राहावे लागते. या तेलामुळे आमचा सात-आठ महिन्यांचे पैसे वाचतील आणि कोणचे आजारपण असलेच तर ते पैसै वापरता येतील, असे ती म्हणाली. एकीकडे दिव्यांचा उत्सव सर्वत्र जल्लोषात सुरू असताना याच दिव्यातील तेलाने गरीब आपल्या भूकेचा अग्नी शमवत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -