घरताज्या घडामोडीबाबो! व्हिडिओ शूटिंगकरता BMW ढकलली नदीत

बाबो! व्हिडिओ शूटिंगकरता BMW ढकलली नदीत

Subscribe

सोशल मीडियावर आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून एका तरुणाने प्रॅन्क व्हिडिओकरता चक्क आपली बीएमडब्लू कार नदीत पाडली आहे.

काहीतरी जगावेगळे केले की, त्या घटनेचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. तर अनेक जण आपला व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काहीतरी इतरांपेक्षा वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न एका ब्रिटनच्या तरुणाने केला आहे. सोशल मीडियावर आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून एका तरुणाने प्रॅन्क व्हिडिओ केला. या व्हिडिओत चक्क या तरुणाने आपली महागडी बीएमडब्लू कार नदीत पाडली आहे. याप्रकरणी आरोपीला पर्यावरणाला हानी पोहचविण्याचा आणि रस्ता सुरक्षिततेशी संबंधित नियम मोडल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

काय केले या तरुणाने?

एका ब्रिटनच्या तरुणाने व्हिडिओ शूट करण्यासाठी बीएमडब्लू कार मार्बेला नदीत खाली पाडली. नंतर या घटनेचा व्हिडिओ तयार करुन त्यांनी तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. मात्र, काहीवेळातच त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला. पण, व्हिडिओ डिलीट करण्यापूर्वी पोलिसांनी तो पाहिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तपासणी करताना पोलिसांना त्या तरुणाकडे बनावट कागदपत्रे मिळाली. तसेच त्याच्याकडे एकच नंबर प्लेट असलेल्या दोन कार देखील आढळून आल्या. या घटनेनंतर पोलिसांनी नदीतून कार बाहेर काढत शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी या आरोपीचे नाव जाहीर करण्यास नकार दिला असून याप्रकरणी तरुणाला पर्यावरणाला हानी पोहचविण्याचा आणि रस्ता सुरक्षिततेशी संबंधित नियम मोडल्याचा आरोप करत अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – घरबसल्या SWIGGY सोबत व्यवसाय सुरु करुन कमवा पैसे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -