घरताज्या घडामोडीBigg Boss 14: निक्कीला १९व्या वर्षी केलं होत किडनॅप!

Bigg Boss 14: निक्कीला १९व्या वर्षी केलं होत किडनॅप!

Subscribe

कलर्स वाहिनीवरील बिग बॉस सीझन १४ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये अनेक सदस्यांनी आपल्या आयुष्यातील रहस्य उलघडली आहेत. रुबीनाने अभिनवसोबतचे लग्न कसे तुटलले होते याचा खुलासा केला आहे. तर निक्की तांबोळीने जेव्हा ती १९ वर्षांची होती तेव्हा ती किडनॅप झाली होती यांचा खुलासा आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस संबंधित असलेल्या ट्विटर अकाऊंटच्या माहितीनुसार, बिग बॉसच्या टास्कदरम्यान निक्की तांबोळीने सांगितले की, ‘जेव्हा ती १९ वर्षांच्या होती तेव्हा ती इंटरनॅशनल मॉडेलिंग असाइनमेंटसाठी गेली होती. या मॉडेलिंगच्या असाइनमेंट दरम्यान तिला किडनॅप केले.’ त्यामुळे याबाबत सांगताना निक्की ढसाढसा रडत म्हणाली की, ‘मला माझ्या पालकांनी ही गोष्टी कधी सांगायची नाही असे सांगितले होते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

- Advertisement -

बिग बॉसच्या या टास्क दरम्यानच्या व्हिडिओ कलर्स टिव्हीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. प्रत्येक सदस्य आपल्या आयुष्यातील रहस्याचा खुलासा करत आहे. एजाजने त्याच्या बालपणाची गोष्ट सांगितली आहे. जी ऐकून कविता कौशिकला देखील अश्रू अनावर झाले आणि तिने एजाजला मिठ्ठी मारली. तर कविताने जेव्हा ती विद्यार्थी होती तेव्हा तिला एका शिक्षकाने छेडछेडा केली होती याचा खुलासा केला आहे. तसेच जास्मिनने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवास सांगितला आहे. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी रुबीना आणि अभिनवाचा घटस्फोट होणार होते, याबाबतचा खुलासा रुबीनाने स्वतः केला आहे. रुबीना आणि अभिनवला नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये सदस्याच्या आयुष्यातील काही गोष्टी समजणार आहेत.


हेही वाचा – विद्या बालनने मंत्र्यासोबत ‘डिनर’ करण्यास दिला नकार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -