घरदेश-विदेशप्रवीण गायकवाड खर्गेंच्या भेटीला; पुण्याची उमेदवारी होणार निश्चित

प्रवीण गायकवाड खर्गेंच्या भेटीला; पुण्याची उमेदवारी होणार निश्चित

Subscribe

शेतकरी कामगार संघटनेचे नेते प्रवीण गायकवाड यांनी पुणे मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे.

शेतकरी कामगार संघटनेचे नेते प्रवीण गायकवाड यांनी आज दिल्लीला जाऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांना पुणे मतदारसंघातून उभे राहायचे आहे. त्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे मतदारसंघासाठी काँग्रेसकडून तिकीट मिळावे यासाठी गायकवाड यांनी कंबर कसले आहे. पुण्याची जागा आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे त्यांनी आज खर्गे यांची भेट घेतली आहे.

काँग्रेच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरु

पुणे मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती.

- Advertisement -

शरद पवारांचीही घेतली होती भेट

प्रवीण गायकवाड यांनी काही दिवसांपर्वी शरद पवार यांचीदेखील भेट घेतली होती. बारामतीतील पवारांचे निवासस्थान गोविंद बाग येते गायकवाड आणि पवार यांची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनीच राहूल गांधी यांना पुणे मतदारसंघासाठी नाव सुचवलं होतं. त्यावर राहूल गांधी यांनी होकारही दिला होता. पंरतु, स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी बाहेरील पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पुण्याची उमेदवारी गायकवाड यांना मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -