घरअर्थजगतPrice Hike: CNG-PNG नंतर आता LPG सिंलिडरही 250 रुपयांनी महागला; पटापट तपासा

Price Hike: CNG-PNG नंतर आता LPG सिंलिडरही 250 रुपयांनी महागला; पटापट तपासा

Subscribe

सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात 250 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या या किमती वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या सिलिंडरची नवी किंमत आता दिल्लीत 2,253 रुपये झाली आहे.

नवी दिल्लीः महागाईनं आधीच वैतागलेल्या सामान्य लोकांना मोदी सरकारनं आणखी एक मोठा झटका दिलाय. मोदी सरकारनं नैसर्गिक गॅसच्या किमती दुपटीनं अधिक वाढवल्यात. या कारणास्तव फक्त LPG गॅस सिंलिडरच नव्हे, तर सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे फक्त गृहिणीचं बजेट कोलमडणार आहे. विशेष म्हणजे पेट्रोलनं आधीच शतक पार केलं असून, घरगुती गॅस सिलिंडरही एक हजारांच्या घरात पोहोचला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात 250 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या या किमती वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या सिलिंडरची नवी किंमत आता दिल्लीत 2,253 रुपये झाली आहे.

- Advertisement -

चेन्नईमध्ये 2400 अधिक किंमत

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 250 रुपयांनी वाढ झाल्यानंतर तोच सिलिंडर आता कोलकात्यात 2,351 रुपये, मुंबईत 2205 रुपये आणि चेन्नईत 2406 रुपये झाला आहे. यापूर्वी 1 मार्च 2022 रोजी सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 105 रुपयांनी वाढ केली होती. तर 22 मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केल्यानंतर ते 9 रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर इंधन कंपन्यांनी घरात वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एकाच वेळी 50 रुपयांनी वाढ केली होती. यानंतर दिल्लीत या लाल रंगाच्या सिलिंडरची किंमत 949.50 वर गेली होती. याआधी 6 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या किमती बदलण्यात आल्या होत्या आणि गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये होती.

दुपटीहून जास्त किमती वाढल्या

पेट्रोलियम मंत्रालयानं गुरुवारी जारी केलेल्या विधानात म्हटलं आहे की, घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती 1 एप्रिलपासून पुढच्या सहा महिन्यासाठी म्हणजेच 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 6.1 डॉलर प्रति एमएमबीटीयू झाल्या आहेत. तसेच 31 मार्चपर्यंत याची किंमत 2.9 डॉलर प्रति एमएमबीटीयू होती.

- Advertisement -

अशा ठरतात किमती

घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमतीत एका वर्षात दोनदा संशोधन केले जाते. आता ऑक्टोबरमध्ये संशोधन होणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि रशियासारखे मोठे गॅस उत्पादन देशांत वार्षिक सरासरीच्या किमतीच्या आधारावर नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवल्या जातात. या बड्या उत्पादकांसाठी वार्षिक सरासरी मूल्य एक तिमाहीच्या आधीच ठरवले जाते. म्हणजेच 1 एप्रिलपासून 30 सप्टेंबरपर्यंतचे भाव जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 च्या सरासरी किमतीच्या आधारावर निर्धारित केले जातात.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -