घरदेश-विदेशनितीन गडकरींच्या कामाचे आनंद महिंद्रांकडून तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'लहानपणी असा रस्ता असता...

नितीन गडकरींच्या कामाचे आनंद महिंद्रांकडून तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘लहानपणी असा रस्ता असता तर….’

Subscribe

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅटिव्ह असतात. त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट अनेकांसाठी चर्चेचा विषय असतो. उद्योगापासून खेळापर्यंत आणि संरक्षणापासून ते शेतीपर्यंत विविध विषयांवर पोस्ट करणारे आनंद महिंद्रा यांनी एका ताज्या पोस्टमधून शाळेच्या दिवसांना उजाळा दिला आहे. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्ट मागचे कारणही खूप रंजक आहे. महिंद्राच्या नुकताच पूर्ण झालेला 10-लेनच्या NH 275 चा फोटो पोस्ट करत बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. यातून केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले आहेत.

नितीन गडकरींची पोस्ट महिंद्रांनी केली शेअर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी NH-275 चे काही फोटो शेअर केले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागाचे हे फोटो आहेत. कर्नाटक राज्यात येणारा हा विभाग 117 किमी लांबीचा असून त्याला 10 लेन आहेत. 8,350 कोटी रुपये खर्चून तो तयार केला जातोय. या महामार्गाचे बांधकाम ऑक्टोबर 2022 पर्यंत तो पूर्ण तयार होईल. असं नितीन गडकरी यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान आनंद महिंद्रा यांनी गडकरींची ही पोस्ट शेअर करत या महामार्गामुळे त्यांचे बालपण आणखी मजेदार कसे झाले असते ते सांगितले आहे. महिंद्रा यांनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी उधगमंडलम (उटी) येथील बोर्डिंग स्कूलमध्ये 5 वर्षे शिकलो. मी मित्रांसोबत बंगलुरूहून शाळेला गाडीने जायचो. आम्हाला किमान 6 तास लागायचे. आता जो हायवे दिसतोय तो त्यावेळी असता तर आमचा प्रवास किती सोपा आणि रोमांचक झाला असता.

- Advertisement -

 

युजर्सनी दिल्या ‘या’ रिएॅक्शन

आनंद महिंद्रा पुन्हा पोस्ट करताच यूजर्सनी त्यावर रिअॅक्शन देण्यास सुरुवात केली आहे. हा महामार्ग नसल्यामुळे प्रवासादरम्यान मित्रांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी नक्कीच मिळाली असती आणि आणखी आठवणी जमा झाल्या असतील, असे एका युजरने सांगितले. महिंद्रांनी युजरच्या या रिअॅक्शनला सहमती दर्शवत त्यावर अगदी बरोबर असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, कन्वेंशनल आणि मॉर्डन असे दोन्ही रस्ते एकत्र असले पाहिजेत. आनंद महिंद्राही याला सहमत असल्याचे दिसले.


1st April 2022 : निर्बंधमुक्ती, टॅक्स बदल; जाणून घ्या 1 एप्रिलपासून काय बदलणार?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -