घरCORONA UPDATEआज पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जनतेशी संवाद

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जनतेशी संवाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन ३.० मध्ये पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधणार आहेत. बुद्ध पौर्णिमा किंवा गौतम बुद्धांचा दिवस म्हणून जगभरात आजचा दिवस वेसाक दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी सकाळी ९ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. यंदा ही बुद्ध पौर्णिमा लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून जगभरात साजरी केली जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या स्मरणार्थ आणि कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांसाठी आजचा हा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

या ठिकाणी होणार थेट प्रक्षेपण 

पवित्र गार्डन लुम्बिनी (नेपाळ), महाबोधी मंदिर (बोधगया, भारत), मूलगंध कुटी विहार (सारनाथ), परिनिर्वाण स्तूप (कुशीनगर) या ठिकाणांमधून प्रार्थना समारंभाचे थेट प्रक्षेपण होईल. भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमेला ‘वेसक डे’ म्हणून साजरा केला जातो.

लॉकडाऊन ३.० मध्ये पहिल्यांदाच संवाद 

जगासह देशातही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय सुचना देतील, याकडे सर्व देशवासियांचे लक्ष लागले आहे. या पूर्वी १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा पंतप्रधानांनी केली होती. मात्र लॉकडाऊन ३.० ची सुचना ही केंद्रातून परिपत्रक काढून करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या अंतरानंतर पंतप्रधान मोदी जनतेसमोर येत असून देशाला कोणती दिशा देणार हे थोड्या वेळात समजेल. देशात आतापर्यंत ३३ हजार ५१४ इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर कोरोनामुळे १ हजार ६९४ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १४ हजार १८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -