घरदेश-विदेशआता विस्तारवादाचे युग संपले

आता विस्तारवादाचे युग संपले

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनला इशारा

आता विस्तारवादाचे युग संपले असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे, असा इशारा चीनला देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सैनिकांचे शौर्य हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठे आहे, असे सांगत सैन्यातील जवानांचे मनोबल वाढवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेह दौरा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी त्यांनी लेह-लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविले.

मोदींनी सीमारेषेवरील तैनात जवानांना संबोधित करताना, आपलं शौर्य हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठे असल्याचे म्हटले. जगभराने आपले शौर्य पाहिले असून घराघरात आपल्या शौर्याच्या कथा सांगितल्या जात आहेत. देशाला आपला अभिमान असून आपल्या पराक्रमाची गाथा सर्वत्र गायली जात आहे. देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत आहे.

- Advertisement -

आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार आहे. देशवासीयांना देशाच्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपर्‍यातून भारतीय जवान आपले शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासीयांनी आपल्यासमोर नतमस्तक केले. गलवान खोर्‍यातील नदी, पर्वत, खोर्‍यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे, असे मोदी म्हणाले.

देशातील 130 कोटी भारतीयांच्या सन्मानाचा हा पराक्रम आहे, देशासाठी बलिदान देणार्‍या राष्ट्रभक्तांची ही भूमी आहे. आपण त्याच भारतमातेचे वीर आहात, ज्या भारतमातेने आजपर्यंत हजारो आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्याने दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अ‍ॅडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा ३१ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल, अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -