घरदेश-विदेशपंजाबचे मुख्यमंत्री उद्या दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

पंजाबचे मुख्यमंत्री उद्या दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर

Subscribe

मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मुलगा दिलशान आणि मुलगी सीरत ही दोन्ही मुलं त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेतून पंजाबमध्ये आले होते

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या म्हणजे ७ जुलै २०२२ रोजी दुसरे लग्न करणार आहेत. चंदिगडच्या सीएम हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. डॉ.गुरप्रीत कौर यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह होणार आहे. ४८ वर्षीय भगवंत मान यांनी २०१५ मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांची पत्नी मुलांसह अमेरिकेत गेली.

सीएम मान यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून 2 मुलं आहेत. त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत आईसह राहतात. भगवंत मान यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित होते.

- Advertisement -

मान यांच्या आई आणि बहिणीने केली मुलगी पसंत

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासाठी डॉ. गुरप्रीत कौर यांची निवड त्यांच्या आई आणि बहिणीने केली आहे. डॉ. गुरप्रीत कौर यांची मान यांच्या बहीण मनप्रीत कौर यांच्याशी पूर्वीपासूनची ओळख आहे. मान यांच्या कुटुंबात त्या सतत येत जात होत्या, मान यांची बहीण मनप्रीत आणि गुरप्रीत या अनेकदा एकत्र शॉपिंग करण्यासाठी जात असत. मान यांची आई हरपाल कौर आणि बहीण मनप्रीत कौर यांनीच भगवंत मान आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचे नाते पक्के केले. यानंतर कुटुंबीयांच्या सांगण्यावरून सीएम मान यांनी लग्नाला संमती दर्शवली.

2014 पासून भगवंत मान यांचे पहिल्या पत्नीसोबतचे संबंध बिघडले

भगवंत मान हे पंजाबमधील एक यशस्वी कॉमेडियन आहेत. त्यांचा पहिला विवाह इंद्रप्रीत कौर यांच्याशी झाला. यानंतर 2012 मध्ये भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. त्यांनी मनप्रीत बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला. 2012 मध्ये त्यांनी लेहरागागा येथून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. यानंतर 2014 मध्ये त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांना संगरूरमधून उमेदवारीचे तिकीट मिळाले. यावेळी त्यांची पत्नी इंद्रप्रीत कौर याही मान यांच्या समर्थनार्थ प्रचाराच्या मैदानात उतरल्या होत्या. मात्र खासदार झाल्यानंतर मान यांचे पत्नीसोबतचे संबंध बिघडत गेले. स्वत: मान यांनीहही याबाबत सांगितले की, ते आता कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हते.

- Advertisement -

त्याआधी भगवंत मान यांनी घटस्फोटाबाबत सांगितले होते की, त्यांना कुटुंब किंवा पंजाब यापैकी एकाची निवड करावी लागली. यावेळी त्यांनी पंजाबची निवड केली. त्यांनी मुलगा दिलशान आणि मुलगी सीरतचेही कौतुक केले. तसेच आपल्या पहिल्या पत्नीने मुलांचे उत्तम संगोपन केल्याबद्दल तिचेही कौतुक केले होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री विवाह सोहळ्यास राहणार उपस्थित 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवंत मान एका सामान्य घरातील मुलीशी लग्न करत आहेत. जिला त्यांची आई आणि बहीण देखील चांगली ओळखते. या विवाह सोहळ्याची जबाबदारी खासदार राघव चढ्ढा पार पाडणार आहेत. पक्षाचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही कुटुंबासह या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.


राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर ‘शिवतीर्था’वर भेटीसाठी रिघ, आमदार सदा सरवणकरांनी घेतली सदिच्छा भेट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -