घरदेश-विदेशपुतीन यांच्यावर होणार कॅन्सर सर्जरी , माजी केजीबी प्रमुख निकोलाई पेत्रुशेव यांच्यावर...

पुतीन यांच्यावर होणार कॅन्सर सर्जरी , माजी केजीबी प्रमुख निकोलाई पेत्रुशेव यांच्यावर देश संरक्षणाची जबाबदारी

Subscribe

रशियाच्या संरक्षणाची जबाबदारी कट्टरपंथी माजी केजीबी प्रमुख निकोलाई पेत्रुशेव (७०) यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.

युक्रेनविरोधात यु्दध पुकारणारे रशियाचे अध्यक्ष राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त असून लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. यादरम्यान, रशियाच्या संरक्षणाची जबाबदारी कट्टरपंथी माजी केजीबी प्रमुख निकोलाई पेत्रुशेव (७०) यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.

पेत्रुशेव हे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव असून रणनीतितज्त्र आहेत. डेल मेलच्या एका अहवालानुसार पत्रुशेव ही तिच व्यक्ती आहे ज्यांनी पुतीन यांना कीव मध्ये नवीन नाझी लोकांचे वास्तव्य असल्याचे सांगितले होते. दरम्यान पुतीन यांना तात्काळ सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात यु्द्ध सुरू असल्याने पुतीन यांनी लगेचच सर्जरी करण्यास नकार दिला होता. पुतीन यांना पोटाचा कॅन्सर असून १८ महिन्याआधी त्यांना पार्किसन्सही झाला. पण ९ मे रोजी त्यांच्या पोटावर सर्जरी करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी पुतीन यांना एप्रिल महिन्यातच सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. पण उपचारादरम्यान देशाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाला द्यायची हा प्रश्न पुतीन यांना भेडसावत होता. त्यामुळे ते सर्जरीसाठी टाळाटाळ करत होते. पण आजार बळावल्याने अखेर पुतीन आता सर्जरीसाठी तयार झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -