घरदेश-विदेशउपग्रह पाडला, पण कोणाचा?

उपग्रह पाडला, पण कोणाचा?

Subscribe

आज उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राचा वापर करून जो उपग्रह पाडला तो नेमका कोणता होता? हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर काही वेळातच त्याचे उत्तरही मिळाले आहे.

आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या चमुने उपग्रहभेदी तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या तीन मिनिटांत लो अर्थ ऑरबिट म्हणजेच 300 किलोमीटर उंचीवरील उपग्रह पाडण्यात यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माध्यमांमधून दुपारी ही घोषणा केली. उपग्रह पाडण्याच्या या तंत्रानंतर समाजमाध्यमांत चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या या कामाचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी पाकिस्तानवर तोंडसुख घेण्याची आयतीच संधी साधली आहे.

दुसरया बाजूला या निमित्ताने काही प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आले आहेत. हा उपग्रह पाडला तो नक्की कोणत्या देशाचा होता? जर तो आपल्याच देशाचा असेल तर तो चाचणीसाठीच तयार करण्यात आला का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आज उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राचा वापर करून जो उपग्रह पाडला तो नेमका कोणता होता? हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर काही वेळातच त्याचे उत्तरही मिळाले आहे.

- Advertisement -

भविष्यात हेरगिरी करणऱ्या उपग्रहांना आळा घालण्यासाठी या तंत्राचा उपयोग भारताला होणार असून आपली उच्च तंत्रज्ञानसज्जता आणि संरक्षण सज्जता वाढली आहे. पृथ्वीपासून सुमारे 350 ते 700 किलोमीटर उंचीवर उपग्रह असतात. मात्र या चाचणीसाठी 300 किलोमीटरची म्हणजेच सध्या अवकाशात असलेल्या अन्य उपग्रहांना हानी होणार नाही अशा अंतरावरील निवड करण्यात आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 300 किलोमीटरवरील उपग्रह पाडल्याने आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचा भंग झालेला नाही आणि चाचणीही सफल झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

- Advertisement -

निम्मा देश टीव्हीपुढे
दरम्यान नोटबंदी आणि जीएसटीनंतर आता नरेंद्र मोदी कोणती घोषणा करतात? याकडे सर्व भारताचे लक्ष लागले होते. नोटबंदीचा धसका घेतलेल्यांपैकी एकाने तर मी आतापासूनच एटीएमसमोर उभा असल्याचे गमतीदार टविटही केले होते.

त्यामुळे पावणे अकरापासूनच कोटयवधी भारतीय टीव्ही समोर किंवा सोशल माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशाची वाट पाहात होते. एका माहितीनुसार सुमारे 30 ते 40 कोटी लोकांनी हे लाईव्ह पाहिल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -