घरदेश-विदेशदेशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय

देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय

Subscribe

लोकसभा निवडणुक तोंडावर आल्यामुळे प्रत्येक पक्षांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 'लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल', असं आश्वासन राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिलं आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर आल्यामुळे प्रत्येक पक्षांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे. आरक्षण, जीएसटी दरातील कपात, अयोध्येतील राम मंदिर प्रकरण या सर्वच गोष्टींना वेग आल्याचे दिसून येत असून मोदी सरकारने निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसतचं आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज एक मोठी घोषणा केली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर पुन्हा एकदा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

हा आहे ऐतिहासिक निर्णय

‘लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल’, असं आश्वासन राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिलं आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर, आता काँग्रेसनं देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसेच्या नेत्यांनी गंगाजल हातात घेऊन, कृष्कर्ज माफ करण्याची शपथ घेतली होती. त्या पक्षाला चांगलाच फायदा झाला आणि तब्बल १५ वर्षानंतर या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकला. या विजयाबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी आज राहुल यांची सभा झाली, त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

- Advertisement -

‘आम्ही विरोधी पक्षात असताना जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करायचो, तेव्हा सरकारचं एकच उत्तर असायचं. आमच्याकडे पैसे नाहीत. देशाच्या चौकीदीरीकडे छत्तीसगडच्या शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रुपये नाहीत, पण अंबानीला द्यायला ३० हजार कोटी रुपये आहेत’, असा टोला राहुल गांधीनी मोदी सरकारवर हाणला आहे.


वाचा – संजय राऊतांची राहुल गांधींनाच पसंती! का?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -