घरदेश-विदेशपंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहुल गांधी नाहीत?

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहुल गांधी नाहीत?

Subscribe

२०१९ साली भाजपचा विजयाचा वारू रोखायचा यासाठी काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे. उत्तरप्रदेशमध्ये सध्या भाजपविरोधात रणनिती आखली जात आहे. यावेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावर कोणतीही चर्चा झालेली नाही.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह आता विरोधकांनी देखील कंबर कसली आहे. काहीही करून भाजपला पराभूत करायचे असा ठाम निश्चिय विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता नेत्यांच्या भेटी-गाठी देखील जोरात सुरू आहेत. देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील भाजपविरोधात खास रणनिती आखली आहे. समविचारी आणि प्रादेशिक पक्षांशी युती करण्यावर काँग्रेस आता भर देताना पाहायला मिळत आहे. यासाठी सध्या काँग्रेसने आता उत्तरप्रदेशमध्ये आपले लक्ष केंद्रीत केले आहे. समविचारी आणि प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हातीश धरून भाजपला टक्कर देण्याची तयारी करत आहे. मात्र, यावेळी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावर मात्र काँग्रेसने मौन पाळणे पसंत केले आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारले असते काँग्रेसने कोणतेही उत्तर दिले नाही. सध्या आम्ही समविचारी पक्षांशी चर्चा आणि जागा वाटपावर चर्चा करत आहोत. भाजपला चारीमुंड्या चित करणे हाच आमचा उद्देश आहे. योग्य वेळी सर्वांच्या विचाराने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करू असे उत्तर काँग्रसचे नेते देत आहेत. त्यामुळे पतंप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेसने प्लॅन देखील तयार केला आहे.

उत्तरप्रदेशातून भाजपला आव्हान

उत्तरप्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. त्यामुळे देशाच्या राजकारणात उत्तरप्रदेशला वेगळेच महत्व आहे. पंतप्रधान कोण? हे ठरवण्याची क्षमता उत्तरप्रदेशमध्ये आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तरप्रदेशकडे जास्त लक्ष देतात. २०१४च्या लोकसभा निवडणुकी वेळी भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देखील उत्तरप्रदेशवर विशेष लक्ष दिले होते. काही दिवस ठाण मांडून बसणे त्यांनी पसंत केले होते. त्याचा परिणाम देखील दिसून आला होता. त्यामुळे आता सपा, बीएसपी आणि काँग्रेस एकत्र येत भाजपला टक्कर देणयाची रणनिती आखत आहेत. त्यासाठी जागा वाटपावर सध्या खल सुरू आहे. कोणतेही मतभेद उफाळून येऊ नयेत यासाठी सोयीस्कररित्या पंतप्रधानपदाच्या नावावर चर्चा करणे टाळले जात आहे. त्यामुळे अद्याप तरी राहुल गांधी यांच्या नावावर कोणतीही चर्चा झालेली नाही. रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या विषयावर प्रमुख्याने लक्ष देण्यात येणार आहे.

- Advertisement -

भाजपसाठी देखील उत्तरप्रदेश महत्त्वाचे राज्य आहे. २०१४ साली देखील उत्तरप्रदेशच्या जनतेने भाजपला भरभरून मते दिली आहेत. भाजपला सत्तेत राहण्यासाठी २३० ते २४० खासदारांची गरज आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने रणनिती आखायला सुरूवात केली आहे. बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळणार नाही असा अंदाज काँग्रेसकडून वर्तवला जात आहे. त्यासाठी काँग्रेसने देखील आता कंबर कसली आहे.

 

वाचा – ‘पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी योग्य उमेदवार’

वाचा – संसदेमध्ये अविश्वास ठरावावर चर्चा; राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ

वाचा – लोकसभा २०१९ची तयारी! फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदींच्या ५० रॅली!!

वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओपन चॅलेंज; ‘हिम्मत असेल तर हैद्राबादमधून लढा’!

वाचा – अमित शहांचा मॅरेथॉन दौरा; ४५ दिवसांमध्ये २९ राज्यांना देणार भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -