घरदेश-विदेशUIDAIबाबतच्या चुकीनंतर गुगलचा माफीनामा!!

UIDAIबाबतच्या चुकीनंतर गुगलचा माफीनामा!!

Subscribe

मोबाईल फोनमध्ये सेव्ह झालेला १८००३००१९४७ हा नंबर गुगलची चुक असल्याचे गुगलने मान्य केले आहे. त्याबद्दल गुगलने माफी देखील मागितली आहे.

देशभरातील अॅन्ड्राईड मोबाईलमध्ये सेव्ह झालेला UIDAIचा टोल फ्री क्रमांक ही गुगलची चुक आहे. ही चुक गुगलने मान्य देखील केली आहे. त्यानंतर गुगलने माफी मागितली आहे. त्यामुळे UIDAIचा नंबर सेव्ह होणं हा सायबर हल्ला नाही तर गुगलची चुक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशभरातील अॅन्ड्राईड मोबाईलमध्ये शुक्रवारी म्हणजेच ३ ऑगस्ट रोजी १८००३००१९४७ नंबर सेव्ह झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर लगेचच UIDAIने कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. पण ही चुक आमची आहे असे गुगलने आता मान्य केले आहे.

- Advertisement -

गुगलने काय दिले स्पष्टीकरण?

UIDAI आणि इतर ११२ हेल्पलाईन नंबर अन्ड्राईडच्या सेटअपमध्ये २०१४ साली कोड करण्यात आले. हा नंबर एकदा कॉन्टेक्ट लिस्टमध्ये आला की डिव्हाईस बदलल्यानंतरही हा नंबर पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव्ह होतो. त्यामुळे जर लोकांना त्रास झाला असेल तर आम्ही त्याबद्दल आम्ही माफी मागतो असे म्हणत गुगलने माफीनामा सादर केला आहे.

UIDAIने काय म्हटले

१८००३००१९४७ हा नंबर UIDAIच्या परवानगीशिवाय सेव्ह झाला. सेव्ह झालेला नंबर आधारचा आहे असे म्हटले जाते. पण, १८००३००१९४७ हा टोल फ्री नंबर नाही. हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. १९४७ हा आधारचा नंबर आहे. तो अद्यापही सुरू आहे. असे स्पष्टीकरण UIDAIकडून देण्यात आले. शिवाय, हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करण्याचा आदेश आम्ही टेलिकॉम कंपन्यांना दिले नाहीत असे देखील UIDAIने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -