घरदेश-विदेश'पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी योग्य उमेदवार'

‘पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी योग्य उमेदवार’

Subscribe

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पतंप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. शिवाय, प्रादेशिक पक्षांची राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा मिळावा यासाठी मनधरणी करणार असल्याचे देखील कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

लोकसभा २०१९च्या निवडणुका तोंडावर येऊ लागताच पंतप्रधानपदासाठी उमेदवार कोण? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार कोण? काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत का? असे अनेक प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहे. राहुल गांधींच्या नावावर विरोधकांचे एकमत झाले नसले तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मात्र राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असून त्यांच्या नावाला पाठिंबा देखील जाहीर केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मत मांडले आहे. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे साहजिक पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असतील असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. राज्याराज्यांमध्ये राजकीय स्थिती वेगळी आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या नावाला बिनविरोध पाठिंबा मिळणे अशक्य. पण आम्ही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची मनधरणी करू असे देखील कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजप विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव करणे सहज शक्य असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले कुमारस्वामी

काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष आहे. शिवाय राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असून त्यांच्या नावाला आमचा पाठिंबा असल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव सहज शक्य असल्याचे देखील कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी जेडीयुने कंबर कसली असून २० ते २५ उमेदवार निवडून आणण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. एच . डी. देवेगौडा हे पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारला असता कुमारस्वामी यांनी नकारार्थी उत्तर दिले. शिवाय, मला देखील राष्ट्रीय राजकारण किंवा पंतप्रधानपदाच्या उमेदवारीमध्ये रस नसल्याचे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले. राज्यातील प्रश्नांवर माझे लक्ष असून कर्नाटकचा कारभार आणखी कसा सुरळीत चालेल यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे कुमारस्वामी म्हणाले. तसेच २०१९ साली भाजपचा पराभव निश्चित असून २०१४ सारखी परिस्थिती आता राहिली नसल्याचे म्हणत कुमारस्वामी यांनी भाजपला इशारा दिला आहे.

- Advertisement -

शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे कुठून आणले?

सत्तास्थापनेनंतर कुमारस्वामी यांनी पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे जवळपास ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यावर प्रश्न विचारला असता, अनेक ठिकाणीहून पैसे गोळा करून कर्जमाफी दिली गेली. मात्र त्यावेळी राज्याच्या विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली गेल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. दरम्यान सत्ता स्थापनेवंतर काँग्रेसपक्षामध्ये कोणतीही नाराजीनसून काही आमदारांचे वैयक्तिक मतभेद असल्याचे एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले.

वाचा – कुमारस्वामींनी शब्द पाळला! कर्नाटकातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी

- Advertisement -

वाचा – एच. डी. कुमारस्वामींनी नाकारले पंतप्रधान मोदींचे फिटनेस चॅलेज

वाचा – …म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री ढसाढसा रडले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -