घरदेश-विदेशलोकसभा २०१९ची तयारी! फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदींच्या ५० रॅली!!

लोकसभा २०१९ची तयारी! फेब्रुवारीपर्यंत नरेंद्र मोदींच्या ५० रॅली!!

Subscribe

२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. फेब्रुवारी पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात तब्बल ५० रॅली काढणार आहेत. शिवाय, अमित शहा, राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी देखील देशभरात ५० रॅली काढणार आहेत.

लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये जातीने लक्ष घातले असून फेब्रुवारी २०१९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात तब्बल ५० रॅली काढणार आहेत. ५० रॅलींच्या माध्यमातून १०० लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधला जाणार आहे. त्याशिवाय मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभा घेणार आहेत. या तिनही राज्यांमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं व्यतिरिक्त भाजप अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील देशभरामध्ये ५० रॅली काढणार आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत पक्ष पोहोचावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून एक रॅली २ ते ३ लोकसभा मतदासंघामधून जाणार आहे. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. अशी माहिती भाजपकडून देण्यात आली.

भाजपने कंबर कसली

२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. अद्याप लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर झालेल्या नाहीत. तत्पूर्वीच भाजपने प्रचार करायला सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत भाजपने ४०० लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल २०० रॅली काढल्या आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. देशभरातील ५० रॅलींव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये देखील रॅली काढणार आहेत. वर्षअखेर या तिनही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार करणार आहेत. ५० रॅलींपैकी पहिली रॅली ही पंजाबमधील मौलत येथे बुधवारी काढण्यात आली. यानंतर उत्तरप्रदेशमध्ये पुढील रॅली काढण्यात येणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. पक्षाला निवडणुकीसाठी तयार करणे आणि प्रचाराचामध्ये आघाडी घेण्याच्या दृष्टीने या रॅलींचे महत्त्व असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

नाराज मित्रपक्ष

२०१४ साली सत्ता स्थापन केल्यापासून भाजप आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मित्रपक्षांनी केला आहे. शिवसेना देखील भाजपवर नाराज असून टीडीपीने भाजपची साथ सोडली आहे. प्रादेशिक पक्षांचे वाढते प्राबल्य पाहता मित्रपक्षांना नाराज करणे भाजपला राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील भाजप करत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यामध्ये जातीने लक्ष घालत असून मित्रपक्षांच्या मनधरणीचा प्रयत्न करत आहेत. अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत बंद दाराआड तब्बल अडीच तास चर्चा केली होती. त्यासंदर्भातील कोणताही तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -